Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण* ...

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्ण* *आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५ टक्के पंचनामे पूर्ण, पंचनाम्याचे काम गतीने सुरू*

 

 

पुणे, दि.२१: खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य नैसर्गिक घटकांमुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील ट्रिगर १ अंतर्गत आठ तालुके व ट्रिगर २ अंतर्गत २ तालुके अशा एकूण १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे सुरु असून ट्रिगर १ अंतर्गत ८ तालुक्यातील ८५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

 

जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमध्ये ट्रिगर १ व आंबेगाव, जुन्नर मध्ये ट्रिगर २ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

 

८ तालुक्यातील ३,०८,९५४ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ६१ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावरील ४ लाख ८६ हजार १८९ खातेदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारीनुसार भोर १२ हजार ९२६, वेल्हा ४ हजार ८२२, खेड ३९ हजार १२९ शिरूर ३० हजार ११०, बारामती ५२ हजार १३०, इंदापूर ४८ हजार ९८९, दौंड ३९ हजार ९९७ आणि पुरंदर ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

 

*आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५ टक्के पंचनामे पूर्ण, पंचनाम्याचे काम गतीने सुरू*

 

दुसऱ्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील २५ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून आंबेगाव तालुक्यातील ५ हजार २१७ खातेदारांचे १ हजार १०७ हेक्टर क्षेत्रावरील तर जुन्नर तालुक्यातील १२ हजार ९७ खातेदारांचे ८ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments