Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा मोटर्सकडून दिवाळीनिमित्त विशेष सर्व्हिस कॅम्पची घोषणा

टाटा मोटर्सकडून दिवाळीनिमित्त विशेष सर्व्हिस कॅम्पची घोषणा

 

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२६ : आगामी दिवाळीच्या निमित्ताने टाटा मोटर्स कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष सर्व्हिस कॅम्पचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना त्यांच्या वाहनांची ३० महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोफत तपासणी करून घेता येईल. टाटा मोटर्सच्या अधिकृत सर्व्हिस वर्कशॉपमध्ये सुरू असून, १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ग्राहकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

यासंदर्भात कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कॅम्पमध्ये एअर कंडिशनिंग यंत्रणा, बॅटरीची स्थिती, टायर आणि व्हील अलाइनमेंट, इंजिन ऑइल, कूलंटची पातळी, इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि सीएनजी यंत्रणेची तपासणी केली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) आवश्यक असलेल्या विशेष डायग्नोस्टिक तपासणीचाही यात समावेश आहे.

मोफत वाहन तपासणीसोबतच ग्राहकांना विविध सेवांवर विशेष सवलती मिळणार आहेत. टाटा मोटर्सच्या पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीतील ग्राहकांना विस्तारित वॉरंटी, टाटा मोटर्सच्या अस्सल अॅक्सेसरीज आणि रोडसाइड असिस्टन्सवर १० टक्के सरळ सूट मिळेल. याशिवाय, विस्तारित वॉरंटी आणि वार्षिक देखभाल करार (अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट – एएमसी) यांसारख्या सुविधांसाठी सुलभ ईएमआय पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहनांच्या देखभालीचा खर्च सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे.

या विशेष सर्व्हिस कॅम्पच्या माध्यमातून वाहनांची देखभाल अधिक सोपी आणि किफायतशीर करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. सणासुदीच्या काळात अनेक कुटुंबे प्रवास करतात. अशा वेळी वाहनांची योग्य तपासणी झाल्यास संभाव्य तांत्रिक अडचणी ओळखण्यास आणि प्रवासासाठी वाहन सज्ज ठेवण्यास मदत होऊ शकते. ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या टाटा मोटर्सच्या अधिकृत सर्व्हिस वर्कशॉपला भेट द्यावी. हा कॅम्प १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आ

हे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments