कर्वेनगर,पुणे
मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी कर्वेनगर परिसरात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर कार्यवाह चेतन भिसे यांनी केले.त्यांनी कर्वेनगरमध्ये चालणाऱ्या विविध सामाजिक प्रकल्पाची माहिती दिली.
या शस्त्रपूजन उत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कर्वेनगर येथील जेम्स (टोळ) हॉस्पिटलच्या संचालिका व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सौ चारुलता बापये ह्या उपस्थित होत्या.
या भव्य कार्यक्रमामध्ये ५०० स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते,तर सुमारे ३०० नागरिक देखील या सोहळ्याचे साक्षीदार बनले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात संघ कार्यातील कुटुंब प्रबोधन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.प्रमुख वक्ते पुणे महानगर कुटुंब प्रबोधन संयोजक अभय ठकार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना उद्देश आणि संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला.
या कार्यक्रमाला कर्वेनगर संघचालक उदयन पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.उपस्थित नागरिकांमध्ये महिलांची,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
संचालनास कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या मैदानापासून निघून कॅनाल राष्ट्र,भालेकर वस्ती,इंगळे नगर, डॉ आंबेडकर चौक,हिंगणे होम चौक,कर्वेनगर पूल मार्गे गेट क्रमांक दोन कर्वे संस्थेच्या मैदानावर सांगता झाली.
कर्वेनगरमधील स्थानिक नागरिकांनी या शिस्तबद्ध संचलनाचे आणि कार्यक्रमाचे ठिकठिकाणी उस्फुर्त सहर्ष स्वागत केले.


