Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedएज बाय क्रोमा'; टिळक रोडवर पहिल्या स्टोअरसह पुण्यात पदार्पण, निवडक हेडफोन्सवर ₹४,५००...

एज बाय क्रोमा’; टिळक रोडवर पहिल्या स्टोअरसह पुण्यात पदार्पण, निवडक हेडफोन्सवर ₹४,५०० पर्यंतची आकर्षक सूट*

 

सॅमसंग स्मार्टफोन्स, गुगल पिक्सेल डिव्हायसेस आणि इतर अनेक उत्पादनांवर विशेष लाँच ऑफर्स उपलब्ध

 

पुणे, २८ ऑक्टोबर, २०२६: टाटा समूहातील एक सदस्य आणि देशाभरातील विश्वासार्ह ‘ओम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर’ असलेल्या ‘क्रोमा’ने पुण्यातील टिळक रोडवर आपल्या पहिल्या ‘एज बाय क्रोमा’ स्टोअरचा शुभारंभ केला आहे. मुंबई आणि बेंगळुरूनंतर अशा पद्धतीचे हे देशातील तिसरे स्टोअर आहे. पुणे शहराच्या प्रमुख मध्यवर्ती भागात सुरू झालेले हे नवीन स्टोअर ग्राहकांना ‘डिजिटल-फर्स्ट’ आणि प्रामुख्याने ‘मोबाईल-केंद्रित’ असा, अगदी जवळच्या रिटेल दुकानाचा अनोखा अनुभव देईल. या स्टोअरमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, ॲक्सेसरीज आणि इतर वैयक्तिक वापराच्या तंत्रज्ञान उत्पादनांची उत्तम श्रेणी उपलब्ध करण्यात आली असून, याला क्रोमाच्या विश्वासार्ह सेवा आणि तज्ञ मार्गदर्शनाची जोड लाभली आहे.

 

१,००० चौरस फुटांचे ‘एज बाय क्रोमा’ स्टोर ‘शॉप नं. २ आणि ३, पिनॅकल प्राईड, सदाशिव पेठ, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सच्या वर, टिळक रोड, पुणे – ४११०३०’ येथे आहे. हे नवीन स्टोर सुरु करून क्रोमाने प्रमुख शहरी बाजारपेठांमध्ये विस्ताराचे आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. पुणेकर रहिवासी आणि नोकरदार ग्राहकांसाठी क्रोमाचा हा ‘नेबरहुड रिटेल फॉरमॅट’ (घराशेजारचे स्टोर) नक्कीच सुविधाजनक ठरेल.

 

इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर – स्टोअर्स, मयंक संगानी यांनी सांगितले, “पुण्यात आमच्या पहिल्या ‘एज बाय क्रोमा’ स्टोअरचा शुभारंभ हे प्रमुख शहरी बाजारपेठांमधील आमचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्राहकांच्या गरजा आणि खरेदीच्या आवडीनिवडी सातत्याने बदलत आहेत. हे लक्षात घेऊन, स्थानिक गरजा पूर्ण करणाऱ्या रिटेल फॉरमॅट्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची खरेदी ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि सोयीची बनवण्यावर आमचा भर आहे. या नवीन स्टोअरच्या माध्यमातून, क्रोमाच्या विश्वासासह आणि तत्पर सेवांच्या बळावर वैयक्तिक वापराच्या तंत्रज्ञान उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देऊन पुण्यातील ग्राहकांशी अधिक घट्ट नाते निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. शहराच्या इतर भागांतही आमचा विस्तार वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

 

हे स्टोर सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस खुले राहील. अधिक माहितीसाठी पुण्यामध्ये टिळक रोडवरील नवीन ‘एज बाय क्रोमा’ स्टोरला भेट द्या किंवा www.croma.comवर लॉग ऑन करा.

 

*ऑफर्स निवडक ब्रँड्स, श्रेणी आणि मॉडेल्सवर लागू आहेत आणि साठा असेपर्यंत मिळतील. अटी व नियम लागू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments