Friday, October 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedYES बँकेकडून नव्या युगातील तरुण पिढीसाठी ‘YES व्हाईब्ज’ ही विशेष सुविधा

YES बँकेकडून नव्या युगातील तरुण पिढीसाठी ‘YES व्हाईब्ज’ ही विशेष सुविधा

शून्य सेवा शुल्क, यूपीआय व्यवहारांवर रिवॉर्ड्स आणि जेन झी च्या जीवनशैलीशी सुसंगत स्मार्ट बँकिंगसह बचत खाते

 

 

 

मुंबई – 28 ऑक्टोबर 2026: काही जण आपला पहिला व्यवसाय छंद म्हणून सुरू करतात. काही कल्पना पहाटे 2 वाजताच सुचतात आणि तेव्हाच त्यांचा अर्थही उमगतो. काही जण आपल्या व्यावसायिक प्रवासाच्या मध्यावरच दिशा बदलतात. तर काहींना 5 वेगवेगळ्या गोष्टी करून पाहायच्या असतात आणि त्यापैकी 2 गोष्टी सोडूनही द्यायच्या असतात. आजच्या पिढीतील भारतातील जवळपास 407 दशलक्ष[1] लोक म्हणजेच जेन झी अशाच प्रकारे आपले जीवन जगत आहेत. ही सर्जनशील निर्माते, प्रवासी, नवनिर्मिती करणारे, विविध पूरक उपक्रमांमध्ये सहभागी होणारी तरुणाई असून ही तरुण पिढी नियमित नोकरी आणि स्वतःच्या आवडीचे प्रकल्प यांचा समतोल साधत आहेत. ही नव्या युगातील पिढी सतत नवनवीन गोष्टी करून पाहते, शिकते, गरजेनुसार आपली दिशा बदलते आणि स्वतःच्या वाटचालीचे नियम स्वतःच ठरवते.

 

 

 

या पिढीच्या जीवनशैलीला केंद्रस्थानी ठेवून YES बँकेने ‘YES व्हाईब्ज’ हे विशेष बचत खाते सुरू केले आहे. हे खाते जेन झी च्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. सतत बदलणाऱ्या आर्थिक सवयी, जीवनशैलीविषयक पसंती आणि डिजिटल माध्यमांना प्राधान्य देणाऱ्या, नेहमी व्यस्त असलेल्या या पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही वेगळी बँकिंग सुविधा विकसित करण्यात आली आहे. या खात्यात शून्य सेवा शुल्क, 22,000 रु. पर्यंतचे खाते सुरू करतानाचे लाभ, YES सिक्युरिटीजच्या माध्यमातून 1 वर्षासाठी शून्य ब्रोकरेजसह मोफत डीमॅट आणि ट्रेडिंग खाते तसेच इतर अनेक फायदे उपलब्ध आहेत. डेबिट कार्डद्वारे केलेल्या खर्चावर 12,000 रु. पर्यंत कॅशबॅक, UPI द्वारे केलेल्या व्यवहारांवर 3,000 रु. पर्यंत रिवॉर्ड्स, चित्रपट आणि बाहेर जेवण करण्यासाठी मनोरंजनविषयक विशेष लाभ अशा सुविधांमुळे ‘YES व्हाईब्ज’ ग्राहकांसाठी दैनंदिन बँकिंग अधिक स्मार्ट आणि फायदेशीर बनवते.

 

 

 

या खात्यासोबत अधिक लाभ आणि विविध वैशिष्ट्यांनी युक्त डेबिट कार्ड्स दिली जातात. खातेधारकाच्या योजनेच्या स्तरानुसार, सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांपर्यंत, या कार्ड्सच्या सुविधा उपलब्ध होतात. YES बँकेच्या रिफ्लेक्शन डेबिट कार्डद्वारे ग्राहकांना स्वतःचा डिस्प्ले पिक्चर (DP) निवडण्याची सुविधा मिळते. YES बँकेचे हेल्थफिट डेबिट कार्ड जिममधील प्रवेश, आरोग्यविषयक तपासण्या आणि औषधांच्या खरेदीवरील लाभ यांसारख्या सुविधांद्वारे आरोग्य व तंदुरुस्तीवर भर देते. ‘YES व्हाईब्ज’च्या ग्राहकांना पहिल्या वर्षासाठी मोफत, मुदत ठेवीच्या (FD) आधारावर मिळणारे क्रेडिट कार्डही उपलब्ध आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने आपला क्रेडिट स्कोअर सुधारता येतो.

 

 

 

YES बँकेचे रिटेल लायबिलिटीज, फी आणि बिझनेस बँकिंग विभागाचे कंट्री हेड श्री. धीरज संघी म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवणे ही नेहमीच YES बँकेच्या धोरणाची मुख्य भूमिका राहिली आहे. आजच्या पिढीसाठी विशेषतः तयार करण्यात आलेली ‘YES व्हाईब्ज’ ही बँकिंग सुविधा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ही पिढी म्हणजे झपाट्याने विकसित होणारा, डिजिटल माध्यमांना प्राधान्य देणारा ग्राहकवर्ग आहे. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आणि तत्काळ मिळणारी दखल यांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहार अधिक सोपे, सुरळीत आणि समृद्ध करण्यासाठी तसेच कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच आर्थिक बाबतीत जबाबदार सवयी विकसित करण्यासाठी हे उत्पादन विशेषतः तयार करण्यात आले आहे. भारताचे आर्थिक भविष्य पुढील अनेक दशकांसाठी घडवणाऱ्या नव्या पिढीशी दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत.”

 

 

 

‘YES व्हाईब्ज’चा शुभारंभ हा नव्या पिढीच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या बँकिंग सुविधांद्वारे या ग्राहकवर्गाशी अधिक दृढ संबंध प्रस्थापित करण्याच्या बँकेच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. ‘YES व्हाईब्ज’ हे ठरावीक चौकटीत न बसणाऱ्या आजच्या पिढीसाठीचे बँकिंग आहे. पहिल्या पगारापासून ते पहिल्या स्टार्टअपपर्यंत. पूरक प्रकल्पापासून ते पूर्णवेळ जोपासलेल्या स्वप्नापर्यंत. त्यांच्यासाठी जी गोष्ट महत्त्वाची आहे, ती YES बँकेसाठीही महत्त्वाची आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments