झी लाईव्हच्या सुपरमूनकडून आयोजित या लाईव्ह शोमध्ये बिस्मिल यांची भावपूर्ण सुफी शायरी, मधुरमय आवाज आणि आधुनिक संगीताची ऊर्जा मेफिल्ड इस्टेट येथे अनुभवता येईल
पुणे, ३० ऑक्टोबर २०२६: बिस्मिल की मेहफीलच्या सादरीकरणासह १ नोव्हेंबर २०२६ रोजी मेफिल्ड इस्टेट येथे संगीतमय सायंकाळी पुण्यातील लाईव्ह मनोरंजनाची रंगत वाढणार आहे. झी लाईव्हचा प्रमुख लाईव्ह मनोरंजन मंच सुपरमूनकडून सादर होणारा हा शो सुफी शायरीची भावनिक खोली, मधुरमय धून आणि समकालीन लाईव्ह कॉन्सर्टच्या ऊर्जेचा सुरेख संगम घडवून आणेल.
पारंपरिक सुफी प्रभाव आणि आधुनिक संगीत मांडणी यांची सांगड घालत बिस्मिल की मेहफील प्रेक्षकांना भावपूर्ण गायकी आणि प्रचंड ऊर्जा देणाऱ्या सादरीकरणाचा अनोखा अनुभव देते. बिस्मिल यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि मंचावरील प्रभावी उपस्थितीसह हा शो सुफी संगीतातील काव्य आणि भावनांना लाईव्ह कॉन्सर्टच्या स्वरूपात समोर आणतो, ज्यामुळे प्रेक्षकांनाही ओळखीच्या सुरांमध्ये सहभागी होण्याची आणि संगीताशी एकरूप होण्याची संधी मिळते.
पुण्यातील शोबाबत मत व्यक्त करत झी लाईव्हचे बिझनेस हेड गॅरेथ एस्विन थॉमस म्हणाले, “पुण्याला समृद्ध सांस्कृतिक आणि मनोरंजन वारसा लाभला आहे येथील प्रेक्षक संगीत आणि लाईव्ह अनुभवांचे मनापासून कौतुक करतात. बिस्मिल की मेहफीलच्या माध्यमातून आम्ही शहरासाठी उत्साहवर्धक सायंकाळ घेऊन येत आहोत, जी सुफी संगीताची समृद्धी साजरी करण्यासोबत लाईव्ह परफॉर्मन्सची ऊर्जा आणि संवादही साधेल. संगीताच्या माध्यमातून व्यक्तींना एकत्र आणणारे अनुभव निर्माण करणे हेच सुपरमूनचे उद्दिष्ट आहे.”
बिस्मिल यांच्यासाठी कलाकार, कविता आणि प्रेक्षक यांच्यातील नाते या अनुभवाच्या केंद्रस्थानी आहे.
बिस्मिल म्हणाले, “मी पुण्यात ‘बिस्मिल की मेहफील’ सादर करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे. माझ्या मते, मेहफील म्हणजे संगीत आणि कवितेतून निर्माण होणारे नाते आणि प्रत्येक सादरीकरणात प्रेक्षक घेऊन येत असलेली ऊर्जा होय. आम्ही सर्वजण एकत्र गात, सुमधुर स्वरांचा आनंद घेत आणि शो संपल्यानंतरही दीर्घकाळ स्मरणात राहणारे क्षण निर्माण करत एका सुरेल सायंकाळसाठी सज्ज आहोत.”
पुण्यातील हे सादरीकरण जाहीर झालेल्या भारत दौऱ्याचा पहिला टप्पा आहे. यानंतर हा दौरा १४ नोव्हेंबरला जयपूर आणि २८ नोव्हेंबरला हैदराबाद येथे जाईल, त्यानंतर २४ डिसेंबरला इंदोर आणि १६ जानेवारी २०२७ रोजी अहमदाबाद येथे पोहोचेल. मुंबई आणि दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इव्हेण्टच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
इव्हेण्टचा तपशील
l इव्हेण्ट: बिस्मिल की मेहफील
l तारीख: १ नोव्हेंबर २०२६
l स्थळ: मेफिल्ड इस्टेट, पुणे
l तिकिटे: https://in.bookmyshow.com/events/bismil-ki-mehf
il/ET00515605


