Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedविसर्जनातून नवसर्जनाचा अर्थ उलगडणारी 'कविता'* डॉ. कमलेश सोमण यांचे मत :...

विसर्जनातून नवसर्जनाचा अर्थ उलगडणारी ‘कविता’* डॉ. कमलेश सोमण यांचे मत : श्री. वा. कुलकर्णी यांच्या ‘मन निळे निळे होई’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न

 

 

पुणे : तिबेटी बौद्ध परंपरेत भिक्षू अनेक दिवस अतिशय बारकाईने रांगोळी साकारतात आणि ती पूर्ण झाल्यानंतर पुसून टाकतात. अनित्यता आणि आसक्तीचा त्याग हा त्यामागील मुख्य संदेश आहे. इच्छा, अहंकार आणि विचारांचे विसर्जन करता आले, तरच खऱ्या अर्थाने समृद्ध होता येते. जुने पुसल्याशिवाय नवे निर्माण होत नाही, हाच विचार ‘रांगोळी’ या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न श्री. वा. कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांच्या या काव्यसंग्रहातून कवीचे आंतरिक वैभव, प्रेम, अप्रदूषित अस्मिता आणि प्रत्यक्ष जीवनानुभवातून झालेला साक्षात्कार यांचे दर्शन घडते, असे मत डॉ. कमलेश सोमण यांनी व्यक्त केले.

 

बिबवेवाडी येथील किमया सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये श्री. वा. कुलकर्णी यांच्या ‘मन निळे निळे होई’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्वाध्याय महाविद्यालयाचे प्रा. दिलीप महाजन, संत साहित्याच्या अभ्यासक लता पाडेकर, श्री. वा. कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. वा. कुलकर्णी यांनी हा काव्यसंग्रह स्वाध्याय महाविद्यालयाला अर्पण केला. यापूर्वी ‘सुमश्री’, ‘निळाईच्या लाटा’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

 

लता पाडेकर म्हणाल्या, कविता ही केवळ वाचायची नसते, तर ती मनात रुजवायची असते. कुलकर्णी सरांची प्रत्येक कविता मनात रुजणारी आहे. कोविडच्या काळात प्रत्यक्ष काम करत असताना सर्वत्र निराशेचे वातावरण होते. अशा वेळी सरांच्या कविता मनाला उभारी देणाऱ्या ठरल्या. त्यांनी लिहिलेली प्रत्येक कविता अर्थपूर्ण आणि समृद्ध आहे. त्यांच्या कवितांमध्ये जीवनानुभव, संवेदनशीलता आणि आशावाद यांचा सुंदर संगम जाणवतो, असेही त्यांनी सांगितले.

 

श्री. वा. कुलकर्णी म्हणाले, जीवनातील अनुभवांकडे अंतर्मुख होऊन पाहताना अनेक विचार कवितेच्या रूपाने व्यक्त झाले. वाचकांनी कविता केवळ वाचू नये, तर तिच्यामागील भावार्थ आणि अनुभव मनात उतरवावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी काव्यसंग्रहातील काही कवितांचे वाचन केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments