Sunday, November 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedइस्कॉन मंदिरात गोपूजनासह ‘काऊ फॉर किड्स’ पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि.५) वसुबारसेनिमित्त...

इस्कॉन मंदिरात गोपूजनासह ‘काऊ फॉर किड्स’ पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि.५) वसुबारसेनिमित्त आयोजन ; ‘संस्कार ते संकल्प’ या विषयावर नव्या पिढीशी संवाद

पुणे : वसुबारसेनिमित्त कोंढवा येथील इस्कॉन एनव्हीसीसी मंदिरात गोपूजन, श्रीकृष्ण दर्शन, पुस्तक प्रकाशन आणि नव्या पिढीशी संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डॉ. भूषण पटवर्धन लिखित ‘काऊ फॉर किड्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

 

गोमातेचे महत्त्व, गोसंवर्धन, पर्यावरण, संस्कृती आणि जीवनमूल्ये या विषयांवर यावेळी संवाद साधला जाणार आहे. तसेच ‘संस्कार ते संकल्प’ या संकल्पनेतून नव्या पिढीशी प्रेरणादायी संवाद आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण, आरोग्य, कला आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर या संवादात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन आणि मंदिर दर्शनाने होईल. त्यानंतर पुस्तक प्रकाशन, गोमातेचे महत्त्व या विषयावर संवाद, नव्या पिढीशी संस्कार ते संकल्प या विषयावर चर्चा होणार आहे.

 

कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. एस. बी. मुजुमदार यांची नात अमृता (येरवडेकर) रुईकर, प्रवीण मसालेचे राजकुमार चोरडिया यांचे पुत्र आनंद चोरडिया, चितळे बंधूचे राजाभाऊ चितळे यांचे नातू इंद्रनील चितळे, संतूर वादक धनंजय दैठणकर यांचे पुत्र निनाद दैठणकर, डॉ. जी. आर. एकबोटे यांची कन्या निवेदिता एकबोटे, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम यांचे पुत्र राहुल कदम, डॉ. सुरेशचंद्र भोसले यांचे पुत्र चिन्मय भोसले, चाणक्य मंडळाचे डॉ. अविनाश धर्माधिकारी यांचे पुत्र सिद्धार्थ धर्माधिकारी, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे डॉ. एस. पी. सरदेशमुख यांचे पुत्र सुकुमार सरदेशमुख आणि पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सचे प्रसन्न पटवर्धन यांचे पुत्र सौरभ पटवर्धन उपस्थित राहणार आहेत.

 

दीपावलीची सुरुवात गोमाता आणि श्रीकृष्णाच्या सान्निध्यात करण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून केवळ २०० जागा उपलब्ध आहेत. प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुकांनी आयोजकांकडे पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments