Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटा उलगडल्या - रायसोनी स्कूल ऑफ लॉतर्फे...

विधी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटा उलगडल्या – रायसोनी स्कूल ऑफ लॉतर्फे दोन विशेष अतिथी व्याख्यानांचे आयोजन

 

पुणे : कायद्याचे शिक्षण घेताना केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञानावर अवलंबून न राहता न्यायालयीन कामकाजाची समज, व्यावहारिक कौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे. न्यायिक सेवा परीक्षेची तयारी आणि विधी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लॉतर्फे दोन विशेष अतिथी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (दि. ३) येरवडा येथील विद्यापीठात हा उपक्रम पार पडला.

पहिल्या सत्रात कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती रफिया खान यांनी ‘जेएमएफसी परीक्षेच्या तयारीचा आराखडा व यशस्वी वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, कायद्याच्या कलमांचा सखोल अभ्यास, संदर्भग्रंथांचे महत्त्व आणि सातत्यपूर्ण तयारीच्या माध्यमातून यश कसे संपादन करता येते, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. गणेश शिरसाट यांनी ‘बियॉण्ड द लॉ डिग्री’ या विषयावर संवाद साधला. वकिली, न्यायिक सेवा, कॉर्पोरेट क्षेत्र, कायदेविषयक सल्लागार, संशोधन अशा विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी त्यांनी उलगडून सांगितल्या. यशस्वी विधिज्ञ होण्यासाठी कायद्याचे सखोल ज्ञान, संवादकौशल्य, विनम्रता आणि व्यावसायिक नैतिकता या गुणांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी, कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर आणि प्र-कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अधिष्ठाता डॉ. सारिका करंजुले, डॉ. हनुमंत दोडके, प्रा. संगीता रावखंडे आणि प्रा. प्रदुम्नी पटेल उपस्थित होते. एलएल.बी., एलएल.एम. आणि बी.ए. एलएल.बी.च्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन अमोल तिवारी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments