पुणे,20 डिसेंबर 2023 : बांग्लादेश,नेपाळ,श्रीलंका आणि भारतातील संरक्षण आणि सामरिक बाबींच्या तज्ञांनी 18 व 19 डिसेंबर 2023 रोजी पुण्यात झालेल्या जनरल बिपिन रावत मेमोेरिअल सेमिनारमध्ये प्रादेशिक सुरक्षा : समस्या,आव्हाने आणि संधी या विषयावर आपले मत मांडले.हा सेमिनार पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी (पीडीएनएस) या पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) च्या संशोधन विभागातर्फे विश्वमित्रता या मालिकेचा एक भाग होता व याला सदर्न कमांडच्या मुख्यालयाचे समर्थन लाभले.
ही मालिका म्हणजे वसुधैव कुटुंबकम या भारताच्या कल्पनेेद्वारे प्रादेशिक स्तराच्या दृष्टीकोनातून चांगला संवाद घडवून आणणे हे आहे.या चर्चासत्रामध्ये नेपाळ लष्कराचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल पवन पांडे,माजी उच्चायुक्त व बांग्लांदेशचे माजी सहाय्यक नौदल प्रमुख रेअर अॅडमिरल ए.एस.एम.ए. अवल (निवृत्त ) आणि श्रीलंकेतील इन्स्टिट्युट ऑफ नॅशनल सिक्युरिटी स्टडीजचे सरसंचालक व संरक्षण मंत्रालयाच्या माध्यम विभागाचे संचालक कर्नल नलिन हेरथ यांनी मार्गदर्शन केले.
मनोहर पर्रिकर इन्स्टिट्युट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅन्ड अॅनालिसिसचे सरसंचालक अॅम्बेसिडर सुजन चिनॉय यांनी बीजभाषण केले.लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंग,एव्हीएसएम,वायएसएम,एसएम,व्हीएसएम,जिओसी – इन – सी,सदर्न कमांड यांनी स्वागतपर भाषण केले.तर चीन,भूतान व पाकिस्तान मधील भारताचे माजी राजदूत अॅम्बेसिडर गौतम बंबावले यांनी आपले मत मांडले.पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटीचे संयोजक लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
याशिवाय भारत सरकारचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले,सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त),लेफ्टनंट जनरल गौतम मूर्ती (निवृत्त) आणि भारत शक्ती आणि स्ट्रॅटस् न्यूज ग्लोबलचे संस्थापक नितीन गोखले यांनी देखील चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.
वक्त्यांनी दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्ये आर्थिक एकात्मता आणि सामायिक मुल्यांवर भर दिला.आपआपल्या राष्ट्रांच्या विविध मुद्द्यांच्या संवेदशीलतेवर त्यांनी भाष्य केले आणि या क्षेत्राच्या भविष्यावर आशावाद व्यक्त केला.
भारताच्या आर्थिक वाढीसह परस्पर सहकार्य आणि आर्थिक विकासाच्या संधींवर विविध वक्त्यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी जनरल बिपिन रावत यांच्यावर एक लघुपट दाखविण्यात आला.जनरल रावत यांच्या कन्या तारिणी रावत यांचे जनरल अजयकुमार सिंग आणि जनरल शमशेरसिंग मेहता यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


