Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedवी'चे नवे 'वी इंटेलिजन्स'; एजेंटिक एंटरप्रायजेसच्या भविष्याची सुरुवात करणारा एआय उपक्रम!

वी’चे नवे ‘वी इंटेलिजन्स’; एजेंटिक एंटरप्रायजेसच्या भविष्याची सुरुवात करणारा एआय उपक्रम!

एआयमध्ये नवसंशोधन, उद्योगांमध्ये परिवर्तन आणि जागतिक पातळीवरील सहकार्याला गती देण्यासाठी ‘पीडब्ल्यूसी इंडिया’सोबत भागीदारी केल्याची घोषणा

 

भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा कंपनी ‘वी’ ने आज ‘वी इंटेलिजन्स’ हा विशेष एआय उपक्रम सुरु केल्याची घोषणा केली. कंपनीच्या स्वतःच्या अंतर्गत कामकाजात, तसेच तिच्या ग्राहकांच्या व्यवसायांमध्ये एआय-आधारित मोठे बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हा धोरणात्मक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ‘वी इंटेलिजन्स’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील उद्योगांना अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे शक्य होणार असून, व्यवसायांना अधिक सक्षम आणि स्मार्ट बनवण्यास मदत होणार आहे.

 

‘वी इंटेलिजन्स लॅब’ हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. ‘पीडब्ल्यूसी इंडिया’च्या भागीदारीतून उभारण्यात आलेली ही लॅब उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या एआय सोल्युशन्सचे संशोधन, विकास आणि विस्तार करण्याचे मुख्य केंद्र म्हणून काम करेल. याद्वारे ‘वी’ची डिजिटल पायाभूत सुविधा आणि ‘पीडब्ल्यूसी इंडिया’चा व्यावसायिक परिवर्तनातील प्रदीर्घ अनुभव एकत्र येणार आहेत. ही लॅब जागतिक स्तरावरील प्रमुख एआय लीडर्स, स्टार्ट-अप्स, संशोधन संस्था आणि उद्योगांना जोडणारे एक जागतिक व्यासपीठ ठरेल, ज्याच्या माध्यमातून व्यवसायांसमोरील खऱ्या आव्हानांवर एआयच्या मदतीने तोडगा काढला जाईल. यासाठी ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ मुंबईत ‘वी’च्या कार्यालयात एक विशेष ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (सीओई) टीम तैनात करणार आहे.

 

या उपक्रमाच्या लाँचवर भाष्य करताना ‘वी’ चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) जगबीर सिंग म्हणाले, “लोकांना, व्यवसायांना आणि उपकरणांना एकमेकांशी जोडण्यात दूरसंचार क्षेत्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, आगामी भविष्यकाळ हा केवळ कनेक्टिव्हिटीचा नसेल तर ‘इंटेलिजन्स’ची भूमिका खूप जास्त महत्त्वाची असेल. ‘वी इंटेलिजन्स लॅब’च्या माध्यमातून आम्ही जागतिक पातळीवरील एआय कौशल्य, धोरणात्मक भागीदारी आणि आमच्या डिजिटल पायाभूत सुविधा एकाच मंचावर आणत आहोत; जेणेकरून एआयच्या पूर्ण क्षमतेचा वापर करणे शक्य होईल. ग्राहकांचा अनुभव अधिक दर्जेदार बनवण्यापासून ते विविध विभागांमधील अंतर्गत कामकाजाची पुनर्रचना करण्यापर्यंत, ही लॅब संस्थांना अत्यंत व्यावहारिक आणि सोप्या पद्धतीने एआय तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मदत करेल. संपूर्ण उद्योग जगतात नवसंशोधनाला गती देणाऱ्या आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या क्षमता निर्माण करण्यासाठी ‘वी इंटेलिजन्स लॅब’ ही आमची वचनबद्धता आहे.”

 

या भागीदारीबद्दल बोलताना ‘पीडब्ल्यूसी इंडिया’चे पार्टनर आणि लीडर (टीएमटी) विनिष बावा म्हणाले, “आपण अशा एका युगाच्या उंबरठ्यावर आहोत, जिथे एआय केवळ संस्थांच्या कामकाजातच बदल घडवून आणणार नाही, तर त्या कशा प्रकारे नवसंशोधन करतात, स्पर्धा करतात आणि आपल्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण करतात, याची संपूर्ण व्याख्याच बदलून टाकेल. उद्योग जेव्हा अधिक स्मार्ट आणि स्वयंचलित कार्यप्रणालीकडे वळतील, तेव्हा त्यांना अशा विश्वासू व्यवस्थेची गरज भासेल जी एआयच्या सुरक्षित वापरासोबतच संशोधनाला गती देऊ शकेल. ‘वी इंटेलिजन्स लॅब’च्या माध्यमातून ‘पीडब्ल्यूसी इंडिया’ आपला ‘एजेंटिक ट्रान्सफॉर्मेशन’मधील दांडगा अनुभव पणाला लावेल. यामुळे संस्थांना एआयच्या क्षमतेचा वापर करून अशी प्रत्यक्ष कौशल्ये विकसित करता येतील, ज्यांची उद्याच्या उद्योगांना टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी गरज भासणार आहे.”

 

‘वी इंटेलिजन्स लॅब’चे कामकाज प्रामुख्याने तीन धोरणात्मक स्तंभांवर आधारित असेल- एजेंटिक, असिस्टिव्ह, आणि सोव्हरिन व रिस्पॉन्सिबल एआय. हे तीन स्तंभ ग्राहक, उद्योग आणि तांत्रिक कामकाज अशा सर्व स्तरांवर एआय सोल्युशन्सच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरतील; तसेच कंपन्यांना पारंपारिक ऑटोमेशनच्या पुढे नेऊन अधिक स्मार्ट आणि स्वयंचलित व्यवसाय कार्यप्रणाली विकसित करण्यास मदत करतील. मजबूत प्रशासकीय चौकटीवर आधारित असणारा प्रत्येक प्रकल्प हा ‘वी’ची स्वतःची जबाबदार एआय नियमावली असलेल्या ‘ग्रॅसी’ (GRACIE) फ्रेमवर्कमधून तावून-सुलाखून पार पडेल. ही लॅब एआय तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापराला प्रोत्साहन देईल, ज्यामुळे डेटा, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि एआय प्रणालींचा वापर नैतिक व पूर्णपणे सुरक्षित पद्धतीने केला जाईल.

 

‘वी इंटेलिजन्स लॅब’चे कामकाज पुढीलप्रमाणे विविध उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून चालेल:

इन्क्युबेशन प्रोजेक्ट्स: व्यवसायांसमोरील गुंतागुंतीच्या आणि कठीण आव्हानांवर तोडगा काढण्यावर या प्रकल्पांचा मुख्य भर असेल.

भविष्यातील गरजांसाठी सज्ज असणाऱ्या उद्योगांना सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या मालकीचे एआय, प्रगत तंत्रज्ञान आणि नवसंशोधन क्षमता विकसित केल्या जातील.

‘वी एआय ओपन’ हॅकाथॉन: जागतिक पातळीवरील आघाडीच्या एआय स्टार्ट-अप हबमधील संशोधकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हॅकाथॉन आणि आव्हानात्मक स्पर्धांचे आयोजन केले जाईल.

ट्रान्सफॉर्मेशन एआय फॅक्टरी: संशोधनाचे टप्पे वेगाने पार करून नवीन संकल्पनांना प्रत्यक्ष प्रायोगिक तत्त्वावर व्यवसायात उतरवण्यासाठी या विशेष सुविधेची रचना करण्यात आली आहे.

एआय कौशल्य विकास कार्यक्रम: कर्मचारी वर्गामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर जलद गतीने वाढवण्यासाठी त्यांच्या क्षमता आणि कौशल्य वाढवणाऱ्या कार्यक्रमांवर भर दिला जाईल.

 

जागतिक पातळीवरील एआय नवसंशोधन आणि दूरसंचार क्षेत्रातील कौशल्याचा मेळ घालत, संस्थांना त्यांच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्यासाठी, ग्राहकांचा अनुभव अधिक दर्जेदार बनवण्यासाठी आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले करण्यासाठी मदत करणे हे ‘वी इंटेलिजन्स लॅब

‘चे उद्दिष्ट आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments