नोव्हाच्या तीन एडिशन्स सोहो (SOHO) व्यवसायांना ‘डीपीडीपी’ नियमांचे पालन करण्यास मदत करणार.
सेक्यूराइट नोव्हाच्या बहुभाषिक मान्यता वैशिष्ट्याद्वारे तुमच्या स्वतःच्या भाषेत माहितीची गोपनीयता सुनिश्चित करता येणार.
पुणे, भारत, २ नोव्हेंबर २०२६: क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने (NSE: QUICKHEAL / BSE: 539678) आपल्या एंटरप्राइज सायबर सुरक्षा ब्रँडच्या माध्यमातून आज “सेक्यूराइट नोव्हा” हे माहितीची सुरक्षा आणि गोपनीयता राखणारे विशेष उत्पादन आज बाजारात सादर केले. नोव्हा ही अशी एआय-सक्षम यंत्रणा आहे, जी स्मॉल ऑफिस/होम ऑफिस (सोहो) व्यवसाय, लघू व मध्यम व्यवसाय (एसएमबी) आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी (मिड-एंटरप्रायझेस) माहितीच्या सुरक्षा आणि गोपनीयतेची “डीपीडीपी” (डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा) पालन प्रक्रिया सोपी व वेगवान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. उद्योग व्यवसायांना ‘नोव्हा’ उत्पादनाचा उपयोग केल्याने व्यवसाय जसजसा वाढेल, तसतसे वैयक्तिक माहितीचे (डेटा) व्यवस्थापन करताना त्यामध्ये अत्यंत कमी मानवी हस्तक्षेप असेल आणि विशेष आयटी कौशल्यांची देखील गरज भासणार नाही. कंपन्यांना अवघ्या काही दिवसांत “डीपीडीपी” पालनाची पूर्तता सुरू करण्यास नोव्हाचे हे एंटरप्राइज-ग्रेड तंत्रज्ञान मदत करणार आहे.
भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा वेगाने विस्तार होत असताना, व्यवसायांसाठी प्रबळ माहिती अनुशासन प्रस्थापित करणे, विखुरलेल्या माहिती स्रोतांमधून वैयक्तिक डेटा ओळखणे, ‘डेटा प्रिन्सिपल्स’च्या हक्कांचा आदर करणे आणि स्पष्ट संमती व्यवस्थापित करणे अनिवार्य झाले आहे. पण, नवीन ‘डीपीडीपी’ कायद्याच्या अंमलबजावणीची पूर्तता करताना अनेकदा किचकट कामकाजी आव्हाने उभी राहतात. लहान व्यवसायांमध्ये संसाधनांची कमतरता व अंतर्गत आयटी कौशल्यांची मर्यादा असल्यामुळे; तसेच वाढत्या व मध्यम उद्योगांसाठी अनुपालनाची उच्च गुंतागुंत यामुळे कायद्याची पूर्तता करणे कठीण होऊन बसते. सेक्यूराइट नोव्हा याच गुंतागुंतीच्या नियामक प्रक्रियेचे रूपांतर सुरळीत, एआय-सक्षम आणि स्वयंचलित अनुपालन प्रवासात करून ही अडचण दूर करते.
हे उत्पादन पुढील तीन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे:
लाइट
इसेंशियल्स
प्रोफेशनल
‘सोहो’ आस्थापनांपासून ते एसएमबी आणि मध्यम उद्योगांपर्यंत सर्व व्यावसायिक घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेक्यूराइट नोव्हा विशेषरित्या डिझाइन करण्यात आले आहे.
एआय-सक्षम शोध, वर्गीकरण आणि बहुभाषिक बुद्धिमत्ता
मानवी प्रयत्न कमी करण्यासाठी आणि माहितीच्या गोपनीयतेच्या पूर्ततेमधील सर्वात कठीण कामे स्वयंचलित करण्यासाठी सेक्यूराइट नोव्हामध्ये प्रगत एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे प्लॅटफॉर्म एंडपॉइंट्स, क्लाउड अॅप्लिकेशन्स, डेटाबेस आणि अनस्ट्रक्चर्ड फाइल्समधील वैयक्तिक डेटा सतत शोधण्यासाठी व वर्गीकृत करण्यासाठी एआयचा वापर करते. “नोव्हा” मध्ये समाविष्ट असलेली बुद्धिमान प्रणाली स्कॅन केलेली कागदपत्रे तसेच चित्र आणि प्रतिमांमध्ये असलेला मजकूरही ओळखू शकते, ज्यामुळे सुरक्षा व गोपनीयता टीम्सना संरक्षणाची आवश्यकता असलेली संवेदनशील माहिती त्वरित ओळखणे शक्य होते. या एआय-आधारित ऑटोमेशनमुळे डेटा तपासणीचे वारंवार करावे लागणारे काम कमी होते आणि कमी आयटी प्रयत्नांत टीम्सना वेगाने निर्णय घेता येतात.
तसेच, गोपनीयता सूचना भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या ‘डीपीडीपी’च्या नियमांची पूर्तता कंपन्यांना करता यावी, यासाठी सेक्यूराइट नोव्हामध्ये इन-बिल्ट एआय लँग्वेज ट्रान्सलेशन इंजिन देण्यात आले आहे. ही क्षमता ग्राहकांच्या संमतीचे पर्याय, गोपनीयता सूचना आणि कुकी प्राधान्य मेनूचे अधिकृतपणे मान्यताप्राप्त २२ भारतीय भाषांमध्ये स्वयंचलित भाषांतर करते, ज्यामुळे व्यवसायांना मानवी देखरेखीसह मॅन्युअल भाषांतराचे काम कमी करून ग्राहकांशी त्यांच्या पसंतीच्या भाषेत पारदर्शकपणे संवाद साधणे शक्य होते.
“वाढत्या व्यवसायांसाठी भारताच्या डीपीडीपी अनुपालनाची पूर्तता करणे ही आता गुंतागुंतीची आणि संसाधनांचा भार वाढवणारी बाब ठरणार नाही,” असे क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश कुमार जी. एस. म्हणाले. “सेक्यूराइट नोव्हाच्या माध्यमातून आम्ही एंटरप्राइज-ग्रेड गोपनीयता तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ केले आहे. तुम्ही काही यंत्रणांवर काम करणारे सोहो व्यवसाय असो, व्यवसाय वाढवणारे एसएमबी असो किंवा ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणावरील डेटाचे व्यवस्थापन करणारे मध्यम उद्योग असो, नोव्हा अत्यंत कमी मानवी हस्तक्षेपासह, विशेष आयटी कौशल्यांवरील मर्यादित अवलंबित्व ठेवून आणि तुमच्या गरजांनुसार गुंतवणुकीसह डीपीडीपी पूर्ततेला गती देण्यासाठी एआय-सक्षम मार्ग उपलब्ध करून देणार आहे.”
वाढत्या कामकाजासाठी सर्वसमावेशक “डेटा प्रायव्हसी” क्षमता
सेक्यूराइट नोव्हा कोणत्याही अनावश्यक कार्यसंचालन अडचणींशिवाय कंपन्यांना त्यांच्या वाढीच्या टप्प्यानुसार आणि गोपनीयतेच्या गुंतागुंतीनुसार गुंतवणूक करण्याची सुविधा देते. व्यवसायांना सुरुवातीला आवश्यक असलेल्या क्षमतांसह सुरुवात करून कामकाज वाढेल तसा विस्तार करता यावा, यासाठी हे उत्पादन सुरुवातीची गुंतवणूक मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहेत. नोव्हा हे विविध व्यवसायांना एंटरप्राइज-ग्रेड गोपनीयता आणि संरक्षणाचे अनेक पर्याय एकाच छताखाली देते:
एंडपॉइंट व्हिजिबिलिटी आणि डेटा लिकेज प्रिव्हेंशन: उपकरणांमधील संवेदनशील वैयक्तिक फाईल्सची स्पष्ट माहिती मिळते, तसेच कंपनीतील महत्त्वाचा आणि संवेदनशील डेटा (माहिती) चोरीला जाण्यापासून, अनधिकृतपणे बाहेर जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रबळ सायबर सुरक्षा उपायांसह नियंत्रण ठेवते.
संमती आणि प्राधान्य व्यवस्थापन: वेब कुकी साठीचे प्राधान्य स्वयंचलित पद्धतीने करता येते आणि सर्व डिजिटल माध्यमांवर ग्राहकांची स्पष्ट संमती नोंदवून व त्याचा मागोवा घेऊन व्यवस्थापित करते.
डेटा सब्जेक्ट रिक्वेस्ट (डीएसआर) वर्कफ्लो: माहितीची उपलब्धता, दुरुस्ती आणि नष्ट करण्याच्या ‘डेटा प्रिन्सिपल्स’च्या विनंत्या पूर्ण करण्यासाठी स्वयंचलित कामकाज प्रणाली प्रदान करून हक्कांचे व्यवस्थापन सुलभ करते.
अत्याधुनिक गोपनीयता कारभार: कडक नियामक कालमर्यादांचे पालन करण्यासाठी सुनियोजित प्रकारे गोपनीयता प्रभावाचे मूल्यमापन केले जाते आणि माहिती कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्वरित सूचना देणाऱ्या प्रतिसादात्मक कार्यप्रणालीसाठी साहाय्य पुरवले जाते.
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड बाबत
क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Quick Heal Technologies Ltd) ही जागतिक स्तरावरील सायबर सुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता कंपनी आहे. क्विक हीलचे प्रत्येक उत्पादन विविध प्लॅटफॉर्म्सवरील अनेक प्रकारच्या डिवाईसेसमध्ये आयटी सुरक्षा व्यवस्थापन सोपे करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ग्राहक, लहान व्यवसाय, सरकारी आस्थापना आणि कॉर्पोरेट संस्थांच्या गरजांनुसार ही उत्पादने डिझाइन केली जातात. जवळपास ३ दशकांच्या कालावधीत कंपनीच्या आरअँडडीने संगणक व नेटवर्क सुरक्षा सोल्युशन्सवर विशेष भर दिला आहे.
क्लाउड-आधारित सुरक्षा आणि प्रगत मशिन लर्निंग-सक्षम सोल्यूशन्सचा सध्याचा पोर्टफोलिओ धोके, सायबर हल्ले आणि संशयास्पद ट्रॅफिक प्रत्यक्ष हल्ला होण्यापूर्वीच रोखतो. यामुळे सिस्टीमच्या संसाधनांचा वापर लक्षणीयरीत्या कमी होतो. हे सुरक्षा सोल्युशन्स भारतात पूर्णपणे स्वदेशी बनावटीने विकसित करण्यात आले आहेत. क्विक हील अँटीव्हायरस सोल्यूशन्स, क्विक हील स्कॅन इंजिन आणि क्विक हील उत्पादनांची संपूर्ण श्रेणी ही क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडची मालकीची उत्पादने आहेत. नुकतेच क्विक हीलने अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोजसाठी उपलब्ध असलेले भारतातील पहिले फसवणूक प्रतिबंधक सोल्यूशन AntiFraud.AI सादर केले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: www.quickheal.co.in
AntiFraud.AI – https://www.quickheal.co.in/quick-heal-antifraud/
सेक्यूराइट बाबत
सेक्यूराइट (Seqrite) ही अग्रगण्य एंटरप्राइज सायबर सुरक्षा सोल्युशन्स प्रदाता कंपनी आहे. सायबर सुरक्षेचे सुलभीकरण करण्यावर भर देत सेक्यूराइट आपल्या पेटंटेड, एआय/एमएल-सक्षम तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मद्वारे डिवाईसेस, अॅप्लिकेशन्स, नेटवर्क्स, क्लाउड, डेटा आणि आयडेंटिटी सुरक्षित ठेवून व्यवसायांना नवीन धोक्यांपासून वाचवण्यासाठी सर्वसमावेशक उत्पादने आणि सेवा प्रदान करते. भारतातील एकमेव सूचिबद्ध सायबर सुरक्षा उत्पादने आणि सोल्यूशन्स कंपनी क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा सेक्यूराइट हा व्यावसायिक विभाग आहे.
आम्ही यूएसए सरकारच्या एनआयएसटी एनसीसीओईच्या डेटा वर्गीकरण प्रकल्पावर अमेरिकन सरकारशी सहयोग करून जागतिक नकाशावर भारताचे स्थान दृढ करणारी पहिली आणि एकमेव भारतीय कंपनी आहोत. अंमलबजावणीसाठी सुलभ आणि अखंडितपणे समाविष्ट होणाऱ्या आमच्या सर्वसमावेशक उपायांमुळे आम्ही वेगळे ठरतो; जे भारतातील सर्वात मोठ्या मालवेअर अॅनालिसिस लॅब – सेक्यूराइट लॅब्समधील अव्वल सुरक्षा तज्ज्ञांच्या जागतिक दर्जाच्या सेवेचे पाठबळ असलेल्या अत्याधुनिक थ्रेट इंटेलिजन्सद्वारे नवीन व गुंतागुंतीच्या धोक्यांविरुद्ध सर्वोच्च पातळीचे संरक्षण देतात. सीएसएमए आर्किटेक्चर शिफारशींशी सुसंगत असणारी आम्ही एकमेव भारतीय फुल-स्टॅक कंपनी असून पुरस्कार विजेते एंडपॉइंट प्रोटेक्शन, एंटरप्राइज मोबाईल डिवाईस मॅनेजमेंट, डेटा प्रायव्हसी, झिरो ट्रस्ट नेटवर्क अॅक्सेस आणि अशा अनेक सेवा देतो. सेक्यूराइट डेटा प्रायव्हसी मॅनेजमेंट सोल्यूशन कंपन्यांना डीपीडीपी कायदा आणि जागतिक नियमांचे पूर्ण पालन करण्यास सक्षम करते. आम्ही नुकतेच बाह्य धोक्यांच्या देखरेखीसाठी डिजिटल रिस्क प्रोटेक्शन सर्व्हिसेस आणि रॅन्समवेअर हल्ल्यानंतर जलद, मार्गदर्शित पुनर्प्राप्तीसाठी रॅन्समवेअर रिकव्हरी अॅज अ सर्व्हिस सुरू केली आहे. वाढत्या सायबर गुंतागुंतीमध्ये इंटेलिजंट, संवादात्मक विश्लेषणासह कंपन्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सेक्यूराइटच्या वतीने GoDeep.AI वर आधारित आणि एलएलएम-सक्षम सुरक्षा सह-पायलट सियाचे (SIA) अनावरणही करण्यात आले आहे. आज ७० हून अधिक देशांमधील ३०,००० पेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपन्या आपल्या सायबर सुरक्षेच्या गरजांसाठी सेक्यूराइटवर विश्वास ठेवतात.
अधिक माहितीसाठी कृप
या भेट द्या: https://www.seqrite.com/


