Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedMH61 मालिकेतील आकर्षक वाहन क्रमांकांसाठी ६ नोव्हेंबरला अर्ज स्वीकारणार*

MH61 मालिकेतील आकर्षक वाहन क्रमांकांसाठी ६ नोव्हेंबरला अर्ज स्वीकारणार*

 

 

पुणे, दि. ५ (जिमाका वृत्तसेवा) : दिवाळी सणानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे MH61 या संकेतांकांतर्गत चारचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक राखून ठेवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांचे अर्ज शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.

 

इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती नवीन नोंदणी विभागात जमा कराव्यात. डीडी ‘R.T.O., Pune’ यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असणे आवश्यक आहे.

 

एकाच पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित अर्जदारांना लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी सीलबंद लिफाफ्यात शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहकार सभागृहात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

 

पसंती क्रमांकासाठी शासनाच्या दि. ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार सुधारित शुल्क लागू राहील. लिलावात समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास चिठ्ठीद्वारे क्रमांक निश्चित करण्यात येईल. नागरिकांनी निर्धारित वेळेत अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments