*नागरिक सर्वेक्षणात १५ नोव्हेंबरपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन*
पुणे, दि. 5 : प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागामार्फत (DARPG) National e-Governance Service Delivery Assessment (NeSDA) २०२५ अंतर्गत नागरिक सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणाचा उद्देश परिवहन सेवा पोर्टलद्वारे (https://parivahan.gov.in) उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती जारी करणे आणि वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती जारी करणे या सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांकडून अभिप्राय प्राप्त करणे हा आहे.
या सर्वेक्षणाची लिंक NeSDA Way Forward पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध असून, नागरिकांना खालील लिंकद्वारे थेट अभिप्राय नोंदविता येणार आहे.
नागरिक सर्वेक्षण लिंक :
https://forms.gle/MPDGVJ&KPBnMKSEA
सर्वेक्षणात अभिप्राय नोंदविण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती या सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी दिलेल्या लिंकद्वारे आपला अभिप्राय नोंदवून सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


