पुणे, दि. ६ (जिमाका वृत्तसेवा) : ऑटोरिक्षा चालक व मालक यांच्या सोयीसाठी शासकीय कामकाजाच्या दिवसांसह शनिवारीही विविध ठिकाणी मीटर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, दिवाळी सणानिमित्त शनिवार ७ नोव्हेंबर २०२६ आणि १४ नोव्हेंबर २०२६ रोजी मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे. असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
00000


