Friday, November 6, 2026
Google search engine
HomeUncategorized*'कमांडर' दिवाळी अंक 2026 चं पुणे इथे प्रकाशन संपन्न*

*’कमांडर’ दिवाळी अंक 2026 चं पुणे इथे प्रकाशन संपन्न*

 

 

*सातत्य आणि वैविध्य असलेला ‘कमांडर’ दिवाळी अंक माहितीपूर्ण व संग्रहणीय*

*- ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ*

 

पुणे दि.६:– “तीस वर्षांची परंपरा असलेला आणि विविधतेने नटलेला ‘कमांडर’ दिवाळी अंक निश्चितच संग्रहणीय व वाचनीय असाच आहे!”, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा लोकप्रिय सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी केलं.

‘कमांडर’च्या चरित्रात्मक चित्रपट तथा बायोपिक विशेषांकाचं प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ह्या छोटेखानी कार्यक्रमास ‘कमांडर’चे संपादक डॉ. राजू पाटोदकर, लेखक व ज्येष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे, धनंजय कुलकर्णी, उपसंपादक विलास कसबे उपस्थित होते.

“दर वर्षी एक वेगळा विषय घेऊन त्यावर संपूर्ण अंक काढण्याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असलेला हा ‘कमांडर’ अंक आहे. दिवाळी अंक काढणं ही बाब आता सोपी राहिलेली नाही. त्यामुळे तीस वर्षांचं सातत्य जपणं ही महाकठीण बाब आहे!”, असं म्हणून श्री गाडगीळ यांनी कमांडरच्या टीमचं कौतुक केलं. तसंच मराठी वाचकांनी दिवाळी अंकांचं वाचन करावं. दिवाळी अंकांची परंपरा मोठी असल्याचं म्हणून त्यांनी ‘कमांडर’च्या पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

डॉ. पाटोदकर यांनी ‘कमांडर’च्या तीस वर्षांच्या प्रवासाबाबत सुधीर गाडगीळ यांना सविस्तर माहिती दिली. ‘कमांडर’च्या या वर्षीच्या चरित्रात्मक चित्रपट तथा बायोपिक विशेषांकामध्ये महाराष्ट्रभरातील, तसंच परदेशातील 56 मान्यवर लेखक, लेखिकांच्या 65 साहित्यकृती असल्याचं सांगितलं.

हा अंक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये, त्याचप्रमाणे बेळगाव-गोवा या ठिकाणी देखील वाचकांसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.

*ठळक वैशिष्ट्यं*

कमांडर दिवाळी अंक चरित्रात्मक चित्रपट तथा बायोपिक विशेषांक – वर्ष 30

*संपादक*

डॉ. राजू पाटोदकर व प्रा. डॉ संजय पाटील देवळाणकर

*पृष्ठ संख्या* 192

*स्वागतमूल्य* 250 रुपये

……..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments