आता करदात्यांना न वापरलेल्या भांडवली नफ्यावर करसवलती सह व्याज मिळवण्याची मिळणार संधी
मुंबई, नोव्हेंबर २०२६- एचडीएफसी बँक या भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकेला भारत सरकार कडून कॅपिटल गेन्स अकाऊंट्स स्कीम (सीजीएएस) १९८८ अंतर्गत ठेवी स्विकारण्याची परवानगी प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. सीजीएएस अंतर्गत करदात्यांना या बँक खात्यात त्यांनी न वापरलेला भांडवली नफा अधिकतर तीन वर्षांसाठी ठेवता येतो.
सीजीएएस अंतर्गत ज्या करदात्यांनी आय कराचे फायलिंग करण्याआधी पुर्नगुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला नाही असे करदाते त्या कालावधीच्या आधी बँकेत बचत खाते आणि फिक्स्ड डिपॉझिट बँकेच्या भारतातील सर्व शहरी आणि निमशहरी (ग्रामीण भागातील शाखा वगळून) शाखांमध्ये उघडू शकतील. आयकर कायद्याच्या संबंधित कलमानुसार, त्यांना केवळ कर सवलतीचा लाभच मिळणार नाही, तर ते जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी आपल्या ठेवींवर व्याजही मिळवू शकतील.
एचडीएफस बँकेतील सीजीएएस योजने अंतर्गत असलेल्या ठेवीच्या खात्याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
सहज सोप्या ठेवी : ग्राहकांना आता एनईएफटी, आरटीजीएस, फंड ट्रान्सफर, आयएमपीएस आणि युपीआय व्यवहार हे ऑनलाईन आणि शाखेत जाऊन दोन्ही पध्दतीने करु शकतील.
झिरो बॅलन्स ठेवणे शक्य : या बचत खात्यात झिरो बॅलन्स ठेवणे शक्य असून शून्य व्यवहार शुल्क लागते.
दर तिमाहीत व्याज : ठेवीधारकांना त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर आणि बचत खात्यावरही दर तीन महिन्यांनी व्याज देण्यात येते.
व्ह्यु ओन्ली डिजिटल ॲक्सेस : ठेवी धारकांना आता नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग च्या माध्यमातून व्ह्यू ओन्ली ॲक्सेस दिला जातो.
अकाऊंट ट्रॅकिंग : अकाऊंट धारकांना आता पासबुक उपलब्ध झाल्याने बचत खात्याची माहिती उपलब्ध होईल तसेच फिक्स्ड डिपॉझिट ची पावती सुध्दा मिळते.
एचडीएफसी बँकेच्या गव्हर्मेंट ॲन्ड इन्स्टिट्युशनल लायबिलिटीज, न्यू इकोनॉमी ग्रुप ॲन्ड आल्टरनेट बँकिंग चॅनल्स ॲन्ड पार्टनरशिप च्या प्रमुख श्रीमती सुनाली रोहरा यांनी सांगितले “ सीजीएएस च्या अंमलबजावणीसाठी आम्हाला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून निवडल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. या सुविधेद्वारे, ग्राहक त्यांच्या न वापरलेल्या भांडवली नफ्यावर व्याज मिळवू शकतात आणि कर सवलतीचाही लाभ घेऊ शकतात. आम्ही ग्राहकांना आवाहन करतो की, त्यांनी आमच्या विस्तृत शाखांच्या नेटवर्क सह डिजिटल क्षमतेचा वापर करून, आपला न वापरलेला भांडवली नफा सुरक्षितपणे गुंतवण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.”
आजमितीस, सर्व भारतीय नागरिक बँकेमध्ये सीजीएएस अंतर्गत ठेव सुविधा मिळवू शकतात. ही सुविधा खालील मालमत्तांच्या हस्तांतरणातून मिळणाऱ्या भांडवली नफ्यासाठी लागू होते:
• निवासी घरे (अपार्टमेंट / इमारत / जमीन)
• शेतजमीन
• निवासी गृह मालमत्तेव्यतिरिक्त इतर कोणतीही भांडवली मालमत्ता
• सक्तीच्या अधिग्रहणाद्वारे हस्तांतरित केलेली, औद्योगिक उपक्रमाचा भाग असलेली जमीन किंवा इमारत
• शहरी भागातून बिगर-शहरी भागात स्थलांतरित केलेली औद्योगिक मालमत्ता (यंत्रसामग्री, मशिनरी, जमीन किंवा इमारत)
• शहरी भागातून विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) स्थलांतरित केलेली औद्योगिक मालमत्ता (यंत्रसामग्री, मशिनरी, जमीन किंवा इमारत).


