Wednesday, November 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedछोट्या मावळ्यांनी साकारली  रायगडाची प्रतिकृती 

छोट्या मावळ्यांनी साकारली  रायगडाची प्रतिकृती 

 

 

पुणे दिनांक ११ नोव्हेंबर २०२६

सन सिटी रोड परिसरात असलेल्या पार्श्व विहार सोसायटी मधील छोट्या मावळ्यांनी साकारली ‘किल्ले रायगड’ची प्रतिकृती.

 

पार्श्व विहार सोसायटीमधील लहान मुले-मुली गेली अनेक वर्षे दिवाळीनिमित्त वेगवेगळे किल्ले तयार करीत असतात. यंदा त्यांनी रायगडाची प्रतिकृती तयार केली. सोसायटी मधील रहिवासी अद्वैत भट यांच्या मार्गदर्शनाखाली राजवीर शिंदे,अर्णव बडवे,विहान शिर्के, अनिश रणवरे,सात्विक मोदगी,विश्वेश निरगुडकर,रुद्र कोल्हे

शर्विल सांगळे, इरा दातीर, वरदा तोरो, अयान जैन यांनी हा किल्ला तयार केला. दिवाळीच्या अगोदर परीक्षा असूनही या मुलांनी फावल्या वेळेत विटा व मातीच्या साह्याने ही प्रतिकृती तयार केली. हे करीत असताना प्लास्टिक वस्तूंचा उपयोग होणार नाही याची काळजी ते करीत त्यांनी ही प्रतिकृती तयार केली आहे.

 

पार्श्व विहार सोसायटीमधील रहिवासी गेली अनेक वर्षे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा वेगवेगळ्या दिवसांचे औचित्य साधून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतात. गणेशोत्सवातही पर्यावरण रक्षणासाठी छोटी छोटी रोपे लावणे व त्याचे संवर्धन करणे असे उपक्रम आयोजित करीत असतात. ंया उपक्रमांना दरवर्षी भरघोस प्रतिसाद मिळत असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments