IL JIN Electronics (India) Limited(“कंपनी”) ही एफअँडएस अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 मधील महसुलाच्या दृष्टीने भारतातील आघाडीची व्हर्टिकली इंटिग्रेटेड आणि तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन व उत्पादन करणारी कंपनी आहे.
IL JIN Electronics ने भांडवली बाजारपेठ नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (“सेबी”) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे.
कंपनी इनिशियल पब्लिक ऑफरिंगद्वारे (आयपीओ) इक्विटी शेअर्स विक्रीस काढून निधी उभारण्याची योजना आखत आहे. या ऑफरमध्ये 250000 लाख रुपये (2500 कोटी रुपये) पर्यंत इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) समावेश आहे.
IL JIN Electronics (India) Limited चार प्रमुख व्यवसाय विभागांमध्ये (व्हर्टिकल्स) कार्यरत आहे: (i) इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (“ईएमएस”), ज्यामध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड असेंब्ली (“पीसीबीए”) आणि बॉक्स बिल्ड सोल्यूशन्सचा समावेश आहे; (ii) बेअर पीसीबी मॅन्युफॅक्चरिंग; (iii) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स; आणि (iv) इंडस्ट्रियल ऑटोमेशन.
कंपनी या आयपीओमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील बाबींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: कंपनी आणि तिच्या काही उपकंपन्या, जसे अॅसेंट सर्किट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि शोगिनी टेक्नोआर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेली थकीत कर्जे आणि त्यावरील जमा झालेले व्याज अंशतः किंवा पूर्णतः परतफेड/पूर्वफेड करण्यासाठी अंदाजे 1,63,600 लाख रुपये (1,636 कोटी रुपये); IL Jin मॅन्युफॅक्चरिंग युनिट्ससाठी विशिष्ट प्लांट, मशिनरी आणि उपकरणांच्या खरेदीसाठी अंदाजे 1,9534.14 लाख रुपये (1,953.41 कोटी रुपये) आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.
कंपनीकडे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ११ उत्पादन सुविधा (मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज) आहेत, त्यांपैकी १० भारतात आणि एक इस्रायलमध्ये आहे. भारतातील या सुविधा उत्तर प्रदेशातील नोएडा व ग्रेटर नोएडा, महाराष्ट्रातील पुणे, तामिळनाडूतील चेन्नई व होसूर आणि कर्नाटकातील बेंगळुरू येथे आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या तारखेनुसार सध्या सहा उत्पादन प्रकल्प बांधकामाधीन असून ते कंपनीच्या भविष्यातील क्षमता विस्तारास हातभार लावतील, अशी अपेक्षा आहे.
मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) आहेत.


