Monday, November 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसा रे ग म प’मध्ये शिवानीच्या सादरीकरणाने कुमार सानू भावुक; तिच्या पाया...

सा रे ग म प’मध्ये शिवानीच्या सादरीकरणाने कुमार सानू भावुक; तिच्या पाया पडून त्यांनी तिला भेट दिले एक महागडे घड्याळ!

पिढ्यांच्या सीमा ओलांडून सूर आणि भावनांना एकत्र गुंफण्याची ताकद संगीतात आहे. यातून साकारलेले हृदयस्पर्शी क्षण सादरीकरण संपल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतात. हाच सुंदर बंध साजरा करण्यासाठी झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प 2026’चा बालदिन विशेष भाग सुरेल सादरीकरणे आणि भावस्पर्शी क्षणांची मेजवानी घेऊन येणार आहे. ‘हिंदुस्तान का संगीतस्थान’ हे आपले ब्रीद सार्थ ठरवत आलेल्या या प्रतिष्ठित गायन रिअॅलिटी शोमध्ये एक भावुक क्षण पाहायला मिळणार आहे. स्पर्धक शिवानीच्या सादरीकरणाने दिग्गज गायक आणि परीक्षक कुमार सानू भारावून जाणार आहेत.

 

चित्रीकरणादरम्यान शिवानीने आपले वडील शिवदास स्वामी यांच्यासोबत मंचावर येत ‘काहे छेडे’ हे गाणे भावपूर्ण रीतीने सादर केले. या बापलेकीच्या सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. जावेद अली यांनी कौतुक करताना उत्स्फूर्त उद्गार काढले, “ये क्या देख लिया, गूजबम्प्स आ गए!” संगीतावरील प्रेमातून वडील आणि मुलीच्या नात्यातील जिव्हाळा या सादरीकरणात सुंदरपणे टिपला गेला.

 

मात्र, या सादरीकरणातील सर्वांत लक्षवेधी क्षण ठरला जेव्हा कुमार सानू यांनी भावुक प्रतिक्रिया दिली. शिवानीचे गायन ऐकून भारावलेल्या कुमार सानू यांनी तिच्या इतक्या लहान वयात एवढे आव्हानात्मक गाणे सादर करण्याच्या क्षमतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तिच्या असामान्य प्रतिभेचे कौतुक करताना ते चित्रीकरणादरम्यान म्हणाले, “खरे सांगायचे तर इतक्या लहान वयात तिने हे गाणे ज्या पद्धतीने गायले, ते ऐकून मला ते मूळ ध्वनिमुद्रणापेक्षाही सरस वाटले. ती खरोखरच एक महान गायिका आहे यात शंकाच नाही. पण या वयात एकाच जागी बसून असे गाणे एकाच टेकमध्ये अचूक गाणे ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे! तिच्यावर कोणता दैवी आशीर्वाद आहे हे मला माहीत नाही; पण तिच्या आईवडिलांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी नक्कीच आहेत.”

 

शिवानीच्या सादरीकरणाने भारावलेले कुमार सानू तिच्याजवळ गेले, ते तिच्या पाया पडले आणि त्यांनी तिला उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वादही दिले. हा क्षण आणखी खास बनवत, त्यांनी प्रेमाची आणि कौतुकाची दाद म्हणून तिला निळ्या रंगाचे आणि सफेद सोन्याचे महागडे घड्याळ भेट दिले. ही अनमोल भेट स्वीकारताना शिवानीही भावुक झाली.

 

या भागात शिवानीचे वडील आणि शंकर महादेवन यांच्यात खास सांगीतिक जुगलबंदीही रंगणार आहे. संगीत वेगवेगळ्या पिढ्यांना कसे एकत्र आणते याची प्रचिती देणारी ही जुगलबंदी बालदिनाच्या सोहळ्यात आणखी रंगत आणेल.

 

मनाला भिडणारी सादरीकरणे, वडील आणि मुलांमधील जिव्हाळ्याचे क्षण, कलाकारांनी एकत्र येत सादर केलेल्या खास सांगीतिक मैफली आणि परीक्षकांकडून मनापासून व्यक्त होणारे प्रेम व कौतुक यांमुळे ‘सा रे ग म प 2026’चा बालदिन विशेष भाग प्रेक्षकांसाठी संगीत, हास्य आणि भावनांनी भरलेली संध्याकाळ घेऊन येणार

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments