Thursday, November 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोंढव्यातील दोन ठिकाणी नो पार्किंग झोन लागू*

कोंढव्यातील दोन ठिकाणी नो पार्किंग झोन लागू*

 

 

पुणे, दि. १९ (जिमाका वृत्तसेवा): कोंढवा परिसरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी कोंढवा खुर्द येथील ब्रह्मा अॅव्हेन्यु सोसायटीच्या ब्लॉक ए-१४ ते ए-१८ पर्यंतच्या २३० मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे.

 

तसेच, कोंढवा बुद्रुक येथील गगन अॅव्हेन्यू सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या दक्षिण बाजूस ४० मीटर व उत्तर बाजूस ३० मीटर अंतरापर्यंत सर्व वाहनांना पार्किंग बंदी करण्यात आली आहे. या अंतरापुढे दुचाकींसाठी सिंगल लेन पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे.

 

याबाबतची अंतिम अधिसूचना पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी जारी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments