गुरुग्राम, १९ नोव्हेंबर २०२६ – जपानचा तोशिबा ग्रुप आणि भारताचा जेएसडब्ल्यू ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या तोशिबा जेएसडब्ल्यू पॉवर सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने आज श्री हिरोयुकी ताओ यांची आपले नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. श्री ताओ यांनी होक्काइडो विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी प्राप्त केली असून ते १९९३ मध्ये तोशिबा ग्रुपमध्ये रुजू झाले.
तोशिबा ग्रुपमधील तीन दशकांहून अधिक वर्षांच्या अनुभवासह, श्री ताओ यांनी थर्मल पॉवर इंजिनीअरिंग, परदेशातील ऊर्जा प्रकल्प, ईपीसी प्रकल्प अंमलबजावणी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन या क्षेत्रांत सखोल कौशल्य विकसित केले आहे. आपल्या कारकिर्दीत श्री ताओ यांनी तोशिबा कॉर्पोरेशन आणि तिच्या उपकंपन्यांमध्ये विविध नेतृत्वाची पदे भूषवली आहेत. श्री ताओ यांची आता तोशिबा जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
परदेशातील ऊर्जा प्रकल्प आणि ईपीसी अंमलबजावणीतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर, श्री ताओ अभियांत्रिकीपासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत गुंतागुंतीच्या ऊर्जा प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्याबाबत मौल्यवान दृष्टिकोनाचे योगदान देतील. त्यांचा हा अनुभव वीजनिर्मिती उपकरणे, देखभाल सेवा आणि डिजिटल सोल्यूशन्स या क्षेत्रांतील तोशिबा जेएसडब्ल्यूच्या वाढीस बळ देईल, तसेच भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि उदयोन्मुख संधींना प्रतिसाद देण्यास कंपनीला मदत करेल.
तोशिबा जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापकीय संचालक पदी झालेल्या आपल्या नियुक्तीवर भाष्य करताना श्री ताओ म्हणाले, “ही जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत सन्मान वाटत आहे. थर्मल पॉवर इंजिनीअरिंग आणि प्रकल्प अंमलबजावणी क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ काम केल्यानंतर, आमच्या अभियांत्रिकी, उत्पादन, प्रकल्प अंमलबजावणी आणि देखभाल सेवा क्षमता अधिक बळकट करण्यासाठी तोशिबा जेएसडब्ल्यू टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. तोशिबाचे तंत्रज्ञान आणि गुणवत्ता- व्यवस्थापन पद्धती यांची आमच्या भारतातील अनुभवाशी सांगड घालून, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या वीज प्रकल्पांची विश्वासार्हता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या विकासात योगदान देण्यासाठी निरंतर सहकार्य करत राहू.”
“डिजिटल तंत्रज्ञानामुळे वीज प्रकल्पांची कामगिरी, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. पॉवर-जनरेशन असेट्सचे परफॉर्मन्स मॉनिटरिंग आणि विश्लेषण करण्यास सहाय्य करण्यासाठी, तोशिबा जेएसडब्ल्यू सध्या एनटीपीसी लिमिटेडसाठी १६५ वीजनिर्मिती युनिट्सचा समावेश असलेल्या ‘EtaPRO’ अंमलबजावणी प्रकल्पाचे काम करत आहे. तोशिबा कॉर्पोरेशन कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज यांसारख्या डीकार्बोनायझेशन तंत्रज्ञानामध्ये सातत्याने प्रगती करत आहे, ज्यामध्ये औष्णिक वीज प्रकल्पांमधून होणारे कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्याची क्षमता आहे. तोशिबा ग्रुपच्या तांत्रिक कौशल्याचा आधार घेत, तोशिबा जेएसडब्ल्यू प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रात आपला व्यवसाय अधिक बळकट करत आहे आणि कार्यक्षम व शाश्वत वीजनिर्मिती उपायांच्या विकासात योगदान देत आहे.”
“तोशिबा जेएसडब्ल्यू चेन्नई येथे एक अत्याधुनिक हेवी इंजिनीअरिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी चालवते, ज्यामध्ये आधुनिक उच्च-अचूकता असलेली यंत्रसामग्री आणि फॅब्रिकेशन सुविधा उपलब्ध आहेत. आमचा हा प्रकल्प ऊर्जा क्षेत्र आणि इतर उद्योगांसाठी मोठ्या अचूक उपकरणांचे उत्पादन, जुळणी आणि चाचणी करण्यासाठी सुसज्ज आहे. तोशिबाच्या गुणवत्ता- व्यवस्थापन पद्धती आणि व्यापक अभियांत्रिकी व उत्पादन क्षमतांच्या पाठबळावर आम्ही सर्वसमावेशक उपाय प्रदान करतो. आमच्या प्रस्थापित उत्पादन पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या बळावर, आम्ही ऊर्जा क्षेत्र आणि इतर उद्योगांमध्ये आमचा व्यवसाय विस्तारण्याच्या संधींचा शोध घेत आहोत,” असे श्री ताओ यां
नी पुढे सांगितले.


