• केअर हेल्थ इन्शुरन्सच्या दाव्याच्या नोंदीत, ऑक्टोबर महिन्यात श्वसनाच्या आजारांमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या दाव्यांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे आढळून आले. या काळात श्वसनाच्या आजारांतही वाढ नोंदवली गेली.
• कंपनीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रुग्णालयात दाखल होण्याच्या एकूण दाव्यांनुसार, ८.२ टक्के दावे श्वसनाशी संबंधित आजारांचे होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ या दोन महिन्यांत या दाव्यांमध्ये ११ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ही आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील सर्वात मोठी वाढ होती.
• आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये श्वसनाच्या आजारांमुळे रुग्णालयात दाखल होण्याच्या दाव्यांमध्ये १ ते १२ वयोगटातील मुले आणि साठ वर्ष तसेच त्याहून जास्त वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित वाटा ५८ टक्के होता.
• २०२५ मधील एप्रिल ते जून महिन्यांच्या तुलनेत २०२६ मधील याच महिन्यांत ६० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या श्वसनासंबंधित आजारांत वाढ झाली. ज्येष्ठ नागरिकांनी या दोन्ही महिन्यात श्वसनासंबंधित दावे केले. या दाव्यांचा वाटा जास्त नोंदवला गेल्याची माहिती कंपनीकडून दिली गेली.
राष्ट्रीय, १९ नोव्हेंबर २०२६ : यंदाच्या हिवाळ्यात वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक प्रमाणावर आढळून आली आहे. वाढते वायू प्रदूषण लक्षात घेता, सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ‘केअर हेल्थ इन्शुअरन्स’च्यावतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात कंपनीने आरोग्यविषयक सल्ला जारी केला आहे. पुणे हवेची गुणवत्ता खालावलेली दिसून येत आहे. १८ नोव्हेंबर रोजी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १४७ वर नोंदवला गेला. हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर गेल्याचे निष्पन्न झाले. यात सूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५) चे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर जाणे टाळावे, आरोग्याविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन ‘केअर हेल्थ इन्शुअरन्स’ने केले आहे.
वायू प्रदूषणामुळे अनेकांचे आरोग्य बिघडत असल्याने विमा कंपनीने दाव्यांची आकडेवारी जाहीर करत सद्यस्थितीची भयावहता दर्शवली आहे. कंपनीच्या दाव्यांच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ या सलग दोन महिन्यांत श्वसनांच्या आजारांमध्ये रूग्णालयात दाखल होण्याच्या दाव्यांमध्ये प्रत्येकी ११ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ही वर्षातील सर्वात मोठी मासिक वाढ ठरली असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. कंपनीने गेल्या वर्षातील तुलनात्मक माहितीही जाहीर केली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये श्वसनाशी संबंधित दाव्यांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांबाबत ५८ टक्के दावा करण्यात आला होता. या संपूर्ण आर्थिक वर्षांत रुग्णालयातील एकूण दाव्यांपैकी सुमारे ८.२ टक्के दावे श्वसनाच्या आजारांशी संबंधित होते. ऑक्टोबर २०२५ साली या दाव्यांचा वाटा सर्वाधिक होता.
वायू प्रदूषणाची खालावलेली पातळी ही संवेदनशील वयोगटासाठी घातक ठरते. याविषयी मंत्रालयीन पातळीवरही आरोग्यविषयक सल्ला जारी करण्यात आला आहे. लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, आधीपासूनच आजारी असलेले लोक, प्रत्यक्ष घटनास्थळावर काम करणारे कर्मचारी यांनी या दिवसांत खास काळजी घ्यावी, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साली श्वसनाच्या तक्रारींमुळे रूग्णालयात दाखल होण्याच्या दाव्यांमध्ये १ ते १२ वयोगटातील मुलांचा वाटा ४० टक्के होता. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ या काळात हा वाटा ४८ टक्क्यांपर्यंत पोहोचला. ६० तसेच त्याहून जास्त वयोगटाच्या नागरिकांमध्ये हे प्रमाण १७ टक्क्यांवर आढळून आले. ऑक्टोबर २०२५ मध्ये या दोन्ही गटांच्या श्वसनाच्या दाव्यांमधील एकत्रित वाटा ६३ टक्क्यांवर पोहोचला.
केअर हेल्थ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी मनीष दोडेजा यांनी वाढत्या वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले,” देशात वायू प्रदूषण ही आरोग्याशी संबंधित समस्या दैनंदिन पातळीवर आढळून येत आहे. याचा थेट परिणाम श्वसन आणि हृदयावर होतो. यामुळे उपचारांची खर्चही वाढतो. कुटुंबातील एखाद्याला गंभीर आजार झाल्यास ही खर्चिक बाब ठरते. संबंधिताला कामावर रुजू होता येत नसल्याने कुटुंबावर आर्थिक ताण येतो. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. मात्र, प्रत्येकजण प्रदूषणाशी थेट संपर्क टाळू शकतो. याबाबतीत डॉक्टरांशी सल्लामसलतही करता येते. यात अचानकपणे आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास कुटुंबावर येणा-या आर्थिक ताणाबाबत समजून घेणे महत्त्वाचे ठरते. या धोक्यांची जाणीव झाल्यास कुटुंबांना आरोग्याबद्दल योग्य निर्णय घेता येईल. आपत्कालीन वैद्यकीय खर्चासाठी पूर्वतयारी करता येईल.”
लोकांमध्ये वाढत्या वायूप्रदूषणाविरोधात जनजागृती करण्यासाठी केअर हेल्थ इन्शुअरन्सने प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केली आहे:
1. दररोज हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) तपासा. एक्यूआयचे प्रमाण २००च्याही पुढे आढळल्यास घराबाहेर व्यायाम करणे टाळा. पहाटे आणि सायंकाळी घराबाहेर जाऊ नका.
2. मर्यादेबाहेरील एक्यूआयचे प्रमाण असलेल्या परिसरात वावरताना एन ९५ मास्कचा वापर करा. घराची दारे आणि खिडक्या बंद ठेवा. घरात हेपा फिल्टर एअर प्युरिफायर वापरा.
3. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दमा, सीओपीडी, हृदयविकार किंवा मधुमेहग्रस्तांनी खास काळजी घ्या. इनहेलर्स तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे जवळ बाळगा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करा.
4. श्वास घेण्यास त्रास होणे, दीर्घकालीन खोकला, धाप लागणे, छातीत दुखणे, धडधड वाढणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे आढळून तातडीने वैद्यकीय मदत घ्या. स्वतःहून कोणत्याही औषधांचे सेवन करू नका.
5. कचरा, पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष जाळणे टाळा. घरातील उद्बत्ती, अगरबत्ती, डालांचा कॉईल जाळून धूर करू नका.
6. वाढत्या उपचार खर्चानुसार, तुमचा विम्याचा दावा पुरेसा आहे की नाही, याकरिता विमा पॉलिसीचा नियमित आढावा घ्या. तुमच्या पॉलिसीमध्ये व्हर्च्युअल कन्सल्टेशन सेवा समाविष्ट आहे का ते तपासा. यामुळे प्राथमिक काळात वैद्यकीय सल्ला उपलब्ध होतो.
हवेची गुणवत्ता खालावत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणा. घरातील संवेदनशील वयोगटातील सदस्यांचे रक्षण करा, असे आवाहन केअर हेल्थ इन्शुअरन्सच्यावतीने करण्यात आले आहे. आरोग्य विम्याचा आढावा घेतल्यास कुटुंबांना अचानक येणा-या वैद्यकीय खर्चासाठी तयारी करणे सोपे होऊ शकते.


