हे त्याच्या सातव्या वर्षात असून ज्युरीचे अध्यक्ष लेखक आणि अनुवादक जेरी पिंटो असतील
ज्युरी सप्टेंबर 2024 मध्ये जाहीर होणाऱ्या दहा शीर्षकांची लाँगलिस्ट निवडणार आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये पाच शीर्षकांची शॉर्टलिस्ट निवडणार आहे
2023 चा जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचर जननी कन्नन यांनी तमिळ भाषेतून अनुवाद केलेल्या, पेरुमल मुरुगन लिखित यर बर्ड ला देण्यात आला
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2024 : भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या साहित्य पुरस्कारांपैकी एक असलेल्या जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचर ने 2024 ची ज्युरी जाहीर केली आहे. प्राईझ मध्ये सातव्या वर्षी ज्युरीचे सदस्य आहेत – लेखक, अनुवादक आणि कवी जेरी पिंटो; कला इतिहासकार आणि क्युरेटर दीप्ती ससिधरन; चित्रपट निर्माते आणि लेखक शौनक सेन; लेखक आणि अनुवादक त्रिदीप सुहृद आणि एक कुशल कलाकार आणि शिक्षणतज्ज्ञ अक्वी थामी. जेरी पिंटो 2024 च्या ज्युरीचे अध्यक्ष असतील.
ज्युरीचा प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि बौद्धिक कला प्रकारांमध्ये माहिर असून त्यांनी विविध भाषा आणि अभिव्यक्तिच्या पद्धतींवर प्रभुत्व मिळविलेले आहे. आपले वैविध्यपूर्ण दृष्टीकोन ठेवून, ते या वर्षी भारतातील सर्वात प्रतिष्ठित कथा कादंबऱ्या शोधण्याच्या बांधीलकीत एकत्र आले आहेत. जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचर ला भारतातील अर्थमुव्हिंग आणि बांधकाम उपकरणांचा अग्रगण्य निर्माता असलेल्या जे.सी.बी इंडिया लिमिटेड द्वारे समर्थन दिले जाते आणि जे.सी.बी लिटरेचर फाऊंडेशन त्याची
देखरेख करते.
यंदाच्या ज्युरीबद्दल बोलताना जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचरच्या साहित्य संचालिका मीता कपूर म्हणाल्या,
“गेल्या सहा वर्षांत भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून वाचक आणि रसिक यांची जे.सी.बी प्राईझ फॉर लिटरेचर शी गाठ पडली असून आणि देशभरात साहित्याला मिळत असलेले प्रेम हे विशेष होते. हे त्याच्या सातव्या वर्षात आहे आणि भारतात आज जे वाचले जात आहे, त्याचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करणारी पुस्तके शोधण्याचा प्रयत्न प्राईझ करत आहे. या वर्षीची ज्युरी बहुपैलू वर्गातून आहे आणि अपवादात्मक लेखन आणि भव्य कथा यांचा पुरस्कार करण्यासाठी जोशपूर्ण ऊर्जा आणि वचनबद्धता त्यांच्यात पहायला मिळते.”
‘जे.सी.बी प्राईझ आता भारतातील साहित्य दिनदर्शिकेचा महत्त्वाचा भाग बनला आहे आणि या ज्युरीचे अध्यक्षपद भूषविण्यास सांगितल्याचा मला अभिमान वाटतो. 2024 च्या ज्युरीचे अध्यक्ष जेरी पिंटो म्हणाले की, वर्षभरातील चांगल्या काळात मनोरंजक लोकांच्या गटाशी पुस्तकांच्या बाबतीत चर्चा करण्याच्या तुलनेत दुसरे काही चांगले असू शकते का?”
प्राईझ च्या बाबतीत अधिक माहितीसाठी, कृपया www.thejcbprize.org ला भेट द्या. अद्यतनांसाठी, इंस्टाग्राम वर @thejc
- bprize साठी पहा.


