ही आंतरराष्ट्रीय मालिका खासकरून अॅमेझॉन मिनी टीव्हीवर स्ट्रीम होणार असून मोफत आयात करण्यात आली आहे
मुंबई, 11 एप्रिल, 2024: – अॅमेझॉन मिनीटीव्ही – अॅमेझॉनची विनामूल्य व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा या एप्रिल महिन्यात तारांकित आंतरराष्ट्रीय कलाकृतींसह 2024 च्या उन्हाळ्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. “मिनी टीव्ही इम्पोर्टेड” अंतर्गत या कलाकृती त्यांच्या मूळ भाषेसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत डब करण्यात येतील. ही कथानकं सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करतील हे नक्की! स्विच ऑन, द गर्ल हू सीज स्मेल्स्, 365 रिपीट द इयर आणि मेलडी ऑफ लव्ह यासह प्रेक्षक पसंतीची कोरियन आणि तुर्की नाटक या सेवेवर प्रदर्शित होणार आहेत. रंजक नवीन घोषणा करण्यासाठी, अमेझॉन मिनीटीव्हीने एक लक्षवेधी पोस्टर प्रसिद्ध केले आहे, प्रेक्षकांना आगामी चित्रपटांच्या आकर्षक जगाची झलक दाखवेल.
प्रदर्शित करण्यात येणाऱ्या कथानकांच्या अनेक शैली आहेत. निरनिराळी पसंती असलेल्या प्रेक्षकांना या मालिका आकर्षित करतील हे निश्चित आहे. काळाच्या प्रवासाद्वारे खुनाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोकाचा थरार असलेल्या ‘स्विच ऑन’ पासून ‘अ गर्ल हू सीज स्मेल्स’ पर्यंत, या कथेत एका महिलेत दृश्यमान रंग आणि आकाराच्या ‘गंध’ पाहण्याच्या विशेष क्षमतेभोवती केंद्रित असलेले एक रोमांचक रहस्यमय नाटक पाहता येईल. या कलाकृती चाहत्यांची उत्कंठा ताणायला लावतील आणि त्यांना आसनाच्या काठावर बसायला लावतील. ‘365: रिपीट द इयर’ ही एक चित्तवेधक कथा सादर करते. ज्यात दहा व्यक्तींना वर्षभराने वेळ पुन्हा वळवण्याची संधी दिली जाते. तथापि, जसजसे ते त्यांचे भवितव्य बदलत जातात, तसतशी अनपेक्षित रहस्ये उलगडतात, अनपेक्षित वळणांसह त्यांचा प्रवास गुंतागुंतीचा होतो. ‘मेलडी ऑफ लव्ह’ हा एक तरल प्रणयरम्य विनोदी चित्रपट आहे, जो एका तरुण प्रौढ याझच्या जीवनावर आधारित आहे. ती विद्यापीठात शिकण्यासाठी इस्तंबूलला येते. मात्र पदवीनंतर तिला तिच्या मूळ गावी परतायचे नसते. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, ती स्वत:ची आई, एमीन हिच्याशी खोटे बोलते आणि इस्तंबूलमध्ये एक नवीन जीवन सुरू करते. तिच्या प्रेम जीवनातील गोंधळाबरोबरच नवीन शहरात राहण्याचे चढउतार या कथेत हेरले आहेत.
अॅमेझॉन मिनीटीव्हीचे हेड ऑफ कंटेंट अमोघ दुसाद म्हणाले, “प्रेक्षकांना विनामूल्य आनंद घेता येईल अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र शीर्षके जोडून ‘मिनीटीव्ही इम्पोर्टेड’च्या श्रेणीत भर घालताना आम्हाला आनंद होतो आहे. या सेवेवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकांच्या कथा वेगळ्या आहेत आणि त्या भारतीय भाषांमध्ये डब केल्याने प्रेक्षकांचा पाहण्याचा अनुभव आणखी वाढेल. प्रेक्षकांची ओळख जेव्हा आंतर-सांस्कृतिक होईल, तेव्हा त्यांच्यादृष्टीने कार्यक्रमांची एक अतुलनीय यादी सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू”.
आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मूळ, हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेत, विशेषतः ‘अमेझॉन मिनीटीव्ही इम्पोर्टेड’ वर अमेझॉनच्या शॉपिंग अॅपमध्ये, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्हीवर विनामूल्य स्ट्रीम होतील किंवा प्ले स्टोअरवरून अॅप डाउनलोड क
रावे.


