राज गादिया( 103धावा)ची धडाकेबाज शतकी खेळी
पुणे, 20 नोव्हेंबर 2026: बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित आयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सलामीच्या लढतीत राज गादिया(103धावा), योगेश पवार(82धावा) यांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर डीव्हीसीए संघाने क्रिकबेसिक्स संघाचा 171 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना डीव्हीसीए संघाने 45 षटकात 8बाद 303धावाचे आव्हान उभे केले. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने डीव्हीसीए संघ 4.3षटकात 3बाद 27धावा असा अडचणीत सापडला. त्यानंतर राज गादियाने 104 चेंडूत 10चौकार व 4 षटकाराच्या 103 धावांची संयमी खेळी केली. त्याला योगेश पवारने 71 चेंडूत 10चौकार व 2 षटकारासह 82 धावा काढून साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 103 चेंडूत 130 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर अवनीश कुलकर्णी नाबाद 36, संतोष राठोड 26यांनी धावा काढून संघाला ३०३ धावांचा टप्पा गाठून दिला. क्रिकबेसिक्स संघाकडून श्रेयस(3-32),वेणुगोपाल व्यास(3-56), नैतिक जाधव( 1-24) यांनी अचूक गोलंदाजी केली.
या आव्हानच पाठलाग करताना क्रिकबेसिक्स संघ28.5 षटकात सर्वबाद 132धावावर संपुष्टात आला. यात कृष्णा पालवे 30, विश्वास कुकरेजा 25, श्रेयस 14, वेणुगोपाल व्यास 12 यांनी थोडासा प्रतिकार केला. डीव्हीसीए संघाकडून संतोष राठोड(3-11), जय गोंदकर(2-11), प्रज्योत गुंडाळे(2-15), अथर्व काळे(2-19) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 171 धावांनी विजय मिळवून दिला. शतकी खेळी करणारा राज गादिया सामन्याचा मानकरी ठरला.
निकाल: साखळी फेरी:
डीव्हीसीए: 45 षटकात 8बाद 303धावा(राज गादिया 103(104,10×4,4×6), योगेश पवार 82(71,10×4,2×6),अवनीश कुलकर्णी नाबाद 36, संतोष राठोड 26, श्रेयस 3-32,वेणुगोपाल व्यास 3-56, नैतिक जाधव 1-24) वि.वि. क्रिकबेसिक्स: 28.5 षटकात सर्वबाद 132धावा(कृष्णा पालवे 30(24,4×4), विश्वास कुकरेजा 25, श्रेयस 14, वेणुगोपाल व्यास 12; संतोष राठोड 3-11, जय गोंदकर 2-11, प्रज्योत गुंडाळे 2-15, अथर्व काळे 2-19); सामनावीर – राज गादिया


