पुणे
( प्रतिनिधी )
भक्तीलासमाजजागृतीचे,कीर्तनाला लोकप्रबोधनाचे माध्यम बनवणारे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५६ व्या जयंतीनिमित्त व कार्तिक एकादशी निमित्त वेदांत सांस्कृतिक मंच व वारकरी संप्रदाय तर्फे कर्वेनगर येथे दिंडी काढण्यात आली होती.
भैरवनाथ विठ्ठल मंदिर पासून सुरू झालेल्या या पालखी- दिंडीमध्ये कर्वेनगर येथीलनागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कमिन्स महाविद्यालय,शाहू मित्र मंडळ,सिद्धिविनायक महाविद्यालय,सुवर्णरत्न सोसायटी,ज्ञानदीप कॉलनी,स्पेंसर चौक,श्रीमान सोसायटी मार्गे ही दिंडी कर्वेनगर येथील पालवबाबा विठ्ठल मंदिरात पोहोचली.तेथे हभप चंद्रकांत वांजळे महाराज ह्यांचे कीर्तन झाले.
दिंडी मध्ये महिला आपल्या डोक्यावर तुलशी वृंदावन घेऊन होत्या तर वात्सल्य पाळणाघरचे बाल कलाकार निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई,जनाबाई,चांगदेव,
,तुकाराम यांच्या वेशभूषेत दिंडी मध्ये उत्साहात सहभागी झाले होते.
“वेदांत सांस्कृतिक मंच”चे स्वयंसेवक,वारकरी संप्रदाय चे वारकरी,हॅपी थॉट्स,तेज ज्ञान फाऊंडेशन चे स्वयंसेवक,विष्णूनाद शंखवादन मंडळ,भैरवनाथ भजनी मंडळ चे कार्यकर्ते तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.टाळ मृदुंग च्या मधुर आवाजामध्ये वारकरी,नागरिक देह -भान विसरून दिंडी च्या आनंदात सहभागी झाले होते.नागरिकांनी विविध ठिकाणी रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले.
“भक्ती ही कोणत्याही एका जातीची धर्माची किंवा वर्गाची मक्तेदारी नसून ती प्रत्येक माणसासाठी आहे हा विचार संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांनी दिला.संत नामदेव महाराज केवळ विठ्ठलाचे भक्त नव्हते तर भक्तीचा मार्गातून समाजाला जोडणारे महान संत होते.म्हणून शेकडो वर्षापासूनचे त्यांचे विचार समाजाला भक्ती,समता आणि माणुसकीचा मार्ग दाखवत आहे” अशी भावना वेदांत सांस्कृतिक मंच चे विनायक बेहेरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
यावेळी हभप चंद्रकांत वांजळे महाराज,वेदांत सांस्कृतिक मंच चे कार्यकर्ते,पालवबाबा विठ्ठल मंदिरात काकड आरतीचे संचालक पोपटराव फेंगसे, काकड आरतीचे प्रमुख विजय अप्पा बराटे,विजय महाराज भिसे,दासबोधाचे अभ्यासक सुहास विटेकर,’सामाजिक समरसता’चे रवि ननावरे तसेच स्थानिक नगर सेवक,सामाजिक कार्यकर्ते यांची मुख्य उपस्थिती होती.
साबुदाण्याची खिचडी प्रसाद वाटप होऊन दिंडीची सांगता झाली.
——


