Monday, November 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedअस्तित्वात असलेल्या 6 मीटर रस्त्यांचे 9 मीटर रुंदीकरण करणे बाबत. खुलासा करावा...

अस्तित्वात असलेल्या 6 मीटर रस्त्यांचे 9 मीटर रुंदीकरण करणे बाबत. खुलासा करावा -संदीप खर्डेकर

पुणे-, पुणे मनपप अस्तित्वात असलेल्या 6 मीटर रस्त्यांचे 9 मीटर रुंदीकरण करणे बाबत चे जाहीर प्रकटन बाबत खुलासा करावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पुण्याचे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे

सध्या पुणे मनपा ने 6 मीटर चे रस्ते 9 मीटर दर्शविण्यासाठी जाहीर प्रकटन देण्यास सुरुवात केली आहे. 18 नोव्हेंबर च्या वृत्तपत्रात औंध मधील रस्ता तर गेल्या आठवड्यात कोथरूड च्या हैप्पी कॉलोनीतील रस्ता रुंदीकरण बाबत प्रकटन वाचण्यात आले. अधूनमधून अश्या जाहिराती येतं आहेतच.

वस्तूत: याबाबतीत अनेक वर्षे मागणी होत आहे कारण अनेक जुन्या जीर्ण शिर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास ( Redevelopment ) रखडला असून सहा मीटर रस्त्यावर इमारतीच्या उंचीवर आणि एफ एस आय ( चटई क्षेत्र निर्देशांक ) वापरावरील बंधनामुळे बांधकाम व्यवसायिक पुनर्विकासास तयार होत नाहीत.

यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचे तर खूपच हाल होत आहेत. जुन्या बांधकामांना लिफ्ट नाही, पुरेशी पार्किंग साठी जागा नाही आणि इमारती आता पडझडीला आल्यात, पावसाळ्यात चाळीस चाळीस वर्षे जुन्या इमारती गळायला लागल्या असून डागडुजी तरी किती करणार असा प्रश्न आहे.

मात्र या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण होतात…

1) सदर रुंदीकरण हे आभासी असणार आहे कां ? म्हणजे बांधकाम व्यवसायिकांना प्लॅन पास करण्यापूरते की प्रत्यक्ष जागेवर तेवढे रुंदीकरण होणार.

2) सर्व पुण्यातील 6 मीटर रस्ता असलेल्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी अथवा नागरिकांनी मागणी केल्यास त्यांना ही हा लाभ देणार कां ?

3) याबाबत सरसकट काही धोरण ठरले आहे काय ?

4) असे रुंदीकरण करत असताना त्या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या बांधकाम प्रकल्पांच्या अनुषंगाने त्या रस्त्यावरील इन्फ्रास्ट्रक्चर वर ताण येऊ नये यासाठी मनपा ने काही योजना केली आहे काय ? विशेष म्हणजे पुरेसा पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन, पावसाळी लाईन व इतर.

5) ह्यापूर्वी मी या संदर्भात माहिती अधिकारात जी माहिती घेतली होती त्यानुसार न्यायालयाने काही निर्देश दिल्यामुळे रुंदीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कळविण्यात आले होते. यात काही बदल झालाय कां?

कृपया वरील बाबतीत योग्य खुलासा करावा अशी विनंती आहे

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments