पुणे दिनांक २३ नोव्हेंबर २०२६: यजमान भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदकांचा षटकार ठोकून इंडिया तायक्वांदो आयोजित पहिल्या इंडिया इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धेत वर्चस्व कायम राखले.
शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांबरोबरच आठ रौप्य व १५ कास्यपदकांची कमाई केली.
पुरुष गटामध्ये भारताच्या शौर्य चक्रवर्ती (५८ किलो), अक्षय हुडा (८० किलो),शशांक सिंग पटेल (८७ किलोवरील) तर महिला गटात त्विशा काकडीया (४६ किलो), पिहू कुमारी (६२ किलो), पुष्पिता रावावरायू (७३ किलोवरील) यांनी सुवर्ण पदक जिंकले.
गटवार निकाल याप्रमाणे :
पुरुष- ५८किलो- १. शौर्य चक्रवर्ती,२. नबीलन अहमद,३. राज रवी व हर्ष सिंग. (सर्व भारत). ६८ किलो -१. यासीन ओमर (पी एल इ),२. दीपांशु कुमार,३. नितेश सिंग व अभयसिंग (सर्व भारत). ८० किलो -१. अक्षय हुडा, २. तेज पटेल,३. नितीश कुमार व अनिल अवधूत. (सर्व भारत).८७ किलोवरील -१. शशांक सिंग पटेल,२. गौरव भट,३. श्रीनिधी काटकर व आकाश ठाकूर. (सर्व भारत).
महिला -४६ किलो १. त्विशा काकडीया,२. रितल शाह,३. रूथ वाझ व कामया म्हलोत्रा. (सर्व भारत).५३ किलो -१. यूयूहो कातोहो (जपान),२. रिशिता राय (भारत), इनिस गिरी (फ्रान्स) व रक्षी चहार (भारत). ६३ किलो – १. पिहू कुमारी,२. मेघना पाटील,3. मनया मिश्रा व राशी सोळंकी(भारत). ७३ किलोवरील – १.पुष्पिता रावावरायू,२. अनामिका डेका,३. तनया आवटे व एरिआ डिसूझा (सर्व भारत).


