पुणे, 25 नोव्हेंबर 2026: बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित आयडीबीआय बी अ स्पोर्ट क्रिकेट अकादमी करंडक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत संस्कार ढवळे(3-2) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर सहारा क्रिकेट अकादमी संघाने क्रिकबेसिक्स संघाचा 64धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला.
सहकारनगर येथील शाहू कॉलेज क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा खेळताना सहारा क्रिकेट अकादमी संघ 18.3 षटकांत सर्वबाद 119धावावर कोसळला. यात शिवराज मंगळूरकर 20, अभिराम गोसावी 17, यशराज गंदे 15, अथर्व मोरे 12 यांनी धावा केल्या. क्रिकबेसिक्स संघाकडून श्रेयस फडतरेने 47धावात 5 गडी बाद केले. त्याला रुद्रांश कुंजीर(2-8), सुयश मुंजाल(1-0) यांनी साथ दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना सहारा क्रिकेट अकादमीच्या संस्कार ढवळे(3-2), सार्थक ताठे(2-13), अद्वैत सुर्वे(2-11) यांच्या भेदक माऱ्यापुढे क्रिकबेसिक्सचा डाव 19.4 षटकात सर्वबाद 55धावावर गारद झाला. यात यथार्थ सोनीच्या 10 धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी खेळी करू शकला नाही. सामनावीर संस्कार ढवळे ठरला.
निकाल: साखळी फेरी:
सहारा क्रिकेट अकादमी: 18.3 षटकांत सर्वबाद 119धावा(शिवराज मंगळूरकर 20, अभिराम गोसावी 17, यशराज गंदे 15, अथर्व मोरे 12, श्रेयस फडतरे 5-47, रुद्रांश कुंजीर 2-8, सुयश मुंजाल 1-0)वि.वि.क्रिकबेसिक्स: 19.4 षटकात सर्वबाद 55धावा(यथार्थ सोनी 10, संस्कार ढवळे 3-2, सार्थक ताठे 2-13, अद्वैत सुर्वे 2-11); सामनावीर-संस्कार ढवळे; सहारा क्रिकेट अकादमीन 64 धावांनी विजयी.


