Wednesday, November 25, 2026
Google search engine
HomeUncategorized*गाळपेरा क्षेत्र चारा पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन...

*गाळपेरा क्षेत्र चारा पिकांच्या लागवडीसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

 

 

पुणे, दि. २५: दुष्काळी परिस्थितीत जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलाशयातील गाळपेऱ्याची जमीन फक्त चारा पिकांच्या लागवडीखाली आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तातडीने नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने पिकांच्या लागवडीसाठी गाळपेरा क्षेत्र उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ.राजेश वासनिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे तसेच लघु पाटबंधारे, मृद व जलसंधारण विभाग व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलाशय तलावातील गाळपेरा क्षेत्र लागवडीसाठी लाभार्थी निवड व वाटपाची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे. गाळपेरा परवानगी देताना पिण्याच्या व पशुधनासाठी आवश्यक पाण्याच्या आरक्षणास प्राधान्य द्यावे. गाळपेरा क्षेत्रात फक्त अल्प कालावधीच्या चारा पिकांना प्राधान्य द्यावे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात पाणी साठ्याची परिस्थिती चांगली आहे, त्यामुळे चारा छावणी सुरु करावी लागणार नाही यादृष्टीने नियोजन करावे, चारा साक्षरता अभियान मोठ्या प्रमाणात राबवावे असेही ते म्हणाले.

 

डॉ.वासनिक यांनी गाळपेरा जमिनीवर चारा उत्पादन घेऊन चारा टंचाई निवारण करता लाभार्थी निवड समन्वय व सह नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे सांगितले तसेच इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविणे पडताळणी व अर्जाची निवड याची प्रक्रिया सांगितली. व रब्बी हंगामासाठी उपलब्ध होणाऱ्या गाळपेरा क्षेत्राची तालुकानिहाय व प्रकल्प निहाय माहिती आठ दिवसात कळवावी, असे सांगितले.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments