भारत, २५ नोव्हेंबर २०२६: भारतातील सर्वेक्षण केलेल्या १० पैकी ८ हून अधिक (८५ टक्के) व्यक्तींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केल्यामुळे उद्योजकता आता करिअरचा मुख्य प्रवाहातील मार्ग आणि प्राथमिक व्यावसायिक महत्त्वाकांक्षा म्हणून उदयास येत आहे. जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क लिंक्डइनच्या संशोधनानुसार, तरुण पिढी या बदलाचे नेतृत्व करत आहेत, जिथे ९४ टक्के जनरेशन झेड आणि ९० टक्के मिलेनियल्सनी उद्योजक होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे सांगितले आहे, यामध्ये पुढील तीन वर्षांत व्यवसाय किंवा साईड हसल सुरू करण्याची योजना आखणाऱ्या दहापैकी सात (७० टक्के) जनरेशन झेड तरुणांचा समावेश आहे. पुरुष आणि महिलांमध्ये या महत्त्वाकांक्षा जवळपास समान आहेत; ९१ टक्के महिला आणि ९४ टक्के पुरुषांनी पुढील काही वर्षांत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लिंक्डइनच्या डेटावरून दिसून येते की, ही महत्त्वाकांक्षा आता वेगाने प्रत्यक्षात येत आहे. २०२२ पासून आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर ‘फाउंडर’ जोडणाऱ्या सदस्यांमध्ये १९० टक्के वाढ झाली आहे, जनरेशन झेडमध्ये ३८३ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जनरेशन झेड वेगाने पुढे येत असले तरी सध्या लिंक्डइनवरील फाउंडर्समध्ये मिलेनियल्सचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ४८ टक्के आहे.
डिजिटल साधने आणि एआयमुळे लघु व्यवसायांच्या वाढीला चालना मिळत आहे. भारतातील सर्वेक्षण केलेल्या ८६ टक्के व्यक्तींनी पाच वर्षांपूर्वीपेक्षा आज उद्योजक होण्याच्या अधिक संधी असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. प्रतिसादकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता (७४ टक्के) आणि व्यावसायिक ज्ञानाची सहज उपलब्धता (६३ टक्के) ही यामागची प्रमुख कारणे सांगितली आहेत. तसेच, ४२ टक्के व्यक्ती म्हणतात की, लिंक्डइनसारखे प्लॅटफॉर्म्स उद्योजकांना प्रतिष्ठा निर्माण करण्यास आणि संभाव्य ग्राहक व भागीदारांशी जोडले जाण्यास मदत करू शकतात.
एआय उद्योजकतेचे लोकशाहीकरण करत आहे
एआय व्यवसायातील प्रवेशाचे अडथळे वेगाने कमी करत आहे आणि संस्थापकांसाठी पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा भाग बनत आहे. भारतातील सर्वेक्षण केलेल्या दहापैकी नऊहून अधिक लघु व्यवसाय संस्थापक एआयचा वापर करतात. एआय आणि डिजिटल साधनांमुळे त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास किंवा चालवण्यास मदत झाल्याचे सांगितलेल्यांपैकी एक तृतीयांशहून अधिक (३६ टक्के) संस्थापकांनी नमूद केले की, या तंत्रज्ञानामुळे ते उत्पादने किंवा सेवा देऊ शकले, जी ते पूर्वी देऊ शकत नव्हते. याव्यतिरिक्त, ज्यांच्या व्यवसायात एआयचा वापर होतो अशा २३ टक्के संस्थापकांच्या मते, एआयशिवाय त्यांना अधिक निधीची आवश्यकता भासली असती.
लिंक्डइन इंडियाचे कंट्री मॅनेजर कुमारेश पट्टाभिरामन म्हणाले, “भारत सध्या उद्योजकतेच्या मोठ्या संक्रमणातून जात आहे. व्यवसाय सुरू करणे आता करिअरपासून दूर जाणारी झेप राहिलेली नाही, तर लाखो व्यक्तींसाठी करिअरचा भाग बनत आहे. एआय प्रयत्न करण्याचा खर्च कमी करत आहे, पण एखाद्या संकल्पनेचे व्यवसायात रूपांतर माणसेच करतात: पहिले दार उघडून देणारे नेटवर्क, काम पूर्णत्वास नेणारी टीम आणि तुमच्यावर विश्वास ठेवणारे ग्राहक. इथेच लिंक्डइनची भूमिका महत्त्वाची ठरते. सर्वात वेगाने प्रगती करणारे संस्थापक परिपूर्ण क्षणाची वाट पाहणार नाहीत, तर ते सुरुवात करतील आणि पुढे जाताना योग्य नातेसंबंध निर्माण करतील.”
एआयचा वापर वाढत असताना विश्वासार्ह नातेसंबंध अधिक महत्त्वाचे ठरत आहेत
एआयच्या वाढत्या वापरामुळे व्यावसायिक नातेसंबंध अधिक मौल्यवान ठरत आहेत. भारतातील सर्वेक्षण केलेल्या जवळपास दहापैकी नऊ (८८ टक्के) लघु व्यवसाय संस्थापकांच्या मते, त्यांच्या व्यवसायात एआयची भूमिका मोठी होत जाईल तसतसे प्रबळ व्यावसायिक नेटवर्क अधिक मौल्यवान बनेल. संस्थापक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार (३९ टक्के) आणि एआय साधनांच्या (३८ टक्के) पुढे जाऊन आपल्या या व्यावसायिक नेटवर्ककडे (४१ टक्के) वळत आहेत.
व्यावसायिक नेटवर्क निर्णायक भूमिका बजावत असताना त्यामध्ये प्रबळ प्रतिष्ठा निर्माण करणे तितकेच आवश्यक झाले आहे. सर्वेक्षण केलेल्या पाचपैकी चार संस्थापकांनी (८० टक्के) सांगितले की, त्यांना विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आणि आपली पोहोच वाढवण्यासाठी स्वतःच्या पर्सनल ब्रँडचा वापर करून कंटेंट क्रिएटर बनावे लागले आहे. याव्यतिरिक्त, ८८ टक्के संस्थापक म्हणतात की, ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी पर्सनल ब्रँड डिझाइन करत आहेत.
पोर्टफोलिओ करिअरचा उदय
उद्योजकता आता एकाच उपक्रमापुरती मर्यादित न राहता पोर्टफोलिओ करिअरकडे वळत आहे, जिथे संस्थापक एकाच वेळी उत्पन्नाचे अनेक स्रोत आणि विविध व्यावसायिक प्रकल्प एकत्रितपणे हाताळतात. भारतातील सर्वेक्षण केलेल्या ७५ टक्के लघु व्यवसाय मालकांनी ते उत्पन्नाचे अनेक स्रोत चालवत असल्याचे सांगितले, ज्यामधून स्थिर मॉडेल दिसून येते, जे व्यक्ती व्यवसाय, साईड प्रोजेक्ट्स आणि उत्पन्नाचे इतर स्रोत एकत्र करते.
ही लवचिकता देखील उद्योजकतेच्या आकर्षणाचा मोठा भाग आहे. भारतातील सर्वेक्षण केलेल्या संस्थापकांमध्ये उद्योजक होण्यामागील प्रमुख प्रेरणा म्हणजे स्वतःच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य (५६ टक्के), कमाईची क्षमता (५२ टक्के) आणि अधिक नियंत्रण व लवचिकता (४९ टक्के) या आहेत. ४१ टक्के व्यक्ती इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या विचाराने प्रेरित आहेत.
तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला तुमचा ग्राहकवर्ग शोधण्यास, तुम्ही काय करता हे शेअर करण्यास आणि कमाई करण्यास मदत करणाऱ्या योग्य साधनांची आवश्यकता असते हे आम्हाला माहित आहे. तुमच्या व्यवसायाची भरभराट होण्यासाठी लिंक्डइन साधनांचा लाभ घेण्याचे ५ मार्ग येथे दिले आहेत:
तुम्ही काय करता याची संपूर्ण माहिती द्या: तुम्ही व्यवसाय चालवत असाल किंवा एकाच वेळी अनेक कामे सांभाळत असाल, तर आता तुमच्या अनुभवामध्ये एकापेक्षा जास्त वर्तमान भूमिका दाखवण्याच्या पर्यायासह ते तुमच्या प्रोफाइलवर अधिक सहजपणे दर्शवू शकता.
चिरस्थायी नातेसंबंध तयार करा: प्रत्यक्ष भेटीतील ओळखीचे चिरस्थायी नातेसंबंधांमध्ये रूपांतर करण्यासाठी लिंक्डइन बिझनेस कार्ड तयार करा. तसेच, नवीन प्रायव्हेट कनेक्शन नोट्ससह प्रीमियम बिझनेस सदस्य त्यांच्या कनेक्शनच्या प्रोफाइलवर वैयक्तिक नोट जोडून त्यांची भेट कशी झाली हे लक्षात ठेवू शकतात.
तुमच्या कौशल्याचे उत्पन्नात रूपांतर करा: अॅडव्हाइस सेशन्ससह तुम्ही थेट तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून १:१ सशुल्क सल्लामसलत देऊ शकता. तुम्ही नवीन डॅशबोर्डमध्ये कमाईच्या संधींचा मागोवा घेऊ शकता किंवा नवीन संभाव्य ग्राहक पाहू शकता.
तुमच्या व्यवसायाला हक्काचे स्थान द्या: प्रीमियम कंपनी पेजेस तुमच्या व्यवसायाला तुमचा ब्रँड प्रदर्शित करण्यासाठी विश्वासार्ह लँडिंग पेज देते आणि तुमचा प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी कस्टम बटण, प्रशस्तिपत्रे (टेस्टिमोनियल्स) आणि ऑटो इन्व्हाइट-टू-फॉलो यांसारख्या वैशिष्ट्यांसह तुमची पोहोच विस्तारते.
तारेवरची कसरत करण्यात कमी आणि प्रगती करण्यात अधिक वेळ घालवा: तुमचा व्यवसाय वाढतो, तसतसे अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात हे आम्हाला माहित आहे. लघु व्यवसाय मालकांचा विचार करून प्रीमियम ऑल-इन-वन डिझाइन करण्यात आले आहे, जे तुम्हाला ग्राहक शोधण्यात, अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात आणि भरती करण्या
त मदत करणारी साधने एकत्र आणते.


