पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अनधिकृत बांधकाम, पार्किंग मधील गोडावून काढून टाकण्यास सांगितले होते. पण प्रशासनाने करावाई करताना दुकानांचे बोर्ड काढून टाकून कारवाईचा उद्देशाला हरताळ फासला.
सर्व शेत्रीय कार्यालयांनी ही बेकायदेशीर कारवाई थांबवावी ह्या करिता व्यापारी महासंघाने मा.महापालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम ह्यांना प्रत्यक्ष भेटून व सखोल चर्चा करून दुकानांचे बोर्ड न पाडण्याची विनंती केली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देवून आज मनपा तर्फे त्यासंबंधीचे पत्रक काढण्यात आले त्याबद्दल पुणे व्यापारी महासंघातर्फे आयुक्तांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.
महासंघाने शहरातील कोणत्याही अनिधीकृत बांधकाम,अनिधिकृत पथारिवाले,बेकायदेशीर अतिक्रमण ह्याला आमचा पाठिंबा नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे उलटपक्षी आयुक्तांचे अभिनंदन केले आहे.
*पुणे व्यापारी महासंघ.*
फतेचंद रांका-अध्यक्ष
महेंद्र पितळिया-सचिव


