India 2026: कोका-कोला इंडिया आपले आयकॉनिक भारतीय ऑरेंज पेय गोल्ड स्पॉट (Gold Spot) पुन्हा एकदा बाजारपेठेत आणत आहे, ज्याला प्रेमाने ‘द झिंग थिंग’ म्हणून ओळखले जाते. नवीन कॅन स्वरूपात पुनरागमन करताना या ब्रँडने आपली खास आंबट-गोड संत्र्याची चव आणि उत्साह पुन्हा आणला आहे, ज्यामुळे हे पेय सर्वांचे अत्यंत आवडते बनले होते.
१९५२ मध्ये भारतात सादर झालेले गोल्ड स्पॉट शाळेतील कॅन्टीन ब्रेक्सपासून आणि वाढदिवसाच्या साजरीकरणापासून गल्लीतील गप्पागोष्टी आणि कौटुंबिक मेळाव्यांपर्यंत दैनंदिन क्षणांचा अविभाज्य भाग बनले होते. १९८० च्या दशकाच्या मध्यात या ब्रँडने अविस्मरणीय ओळख ‘द झिंग थिंग’ सादर केली, ज्याने त्याची रिफ्रेशिंग ऊर्जा आणि उत्साह अचूक कॅप्चर केला होता.
कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्स विभागाच्या मार्केटिंग प्रमुख सुमेली चॅटर्जी म्हणाल्या: “गोल्ड स्पॉटसोबत लहानाचे मोठे झालेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखी एक आठवण आहे आणि हेच चिरस्थायी नाते या पुनरागमनाला अधिक अर्थपूर्ण बनवते. गोल्ड स्पॉट तीच आंबट-गोड संत्र्याची चव घेऊन येत आहे, जी ग्राहकांच्या आठवणीत आहे आणि आता हे पेय कॅनमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, या पेयाचा पहिल्यांदाच अनुभव घेणाऱ्या व्यक्तींसाठी फक्त एक घोट पुरेसा आहे आणि यातील ‘झिंग’ आपली जादू दाखवेल. आम्हाला गोल्ड स्पॉटचे पुन्हा स्वागत करताना आणि ग्राहकांच्या नवीन पिढीसोबत त्याचा पुढील अध्याय सुरू करताना अत्यंत अभिमान वाटत आहे. ‘द झिंग थिंग’ पुन्हा परतले आहे!”
१९९३ मध्ये गोल्ड स्पॉट द कोका-कोला कंपनीच्या परिवारात सामील झाले आणि तेव्हापासून भारतातील व्यक्तींच्या आठवणींमध्ये त्याचे स्थान अधिक दृढ झाले आहे. आता हे पेय आपली ओळख कायम राखणाऱ्या एका आधुनिक कॅनमध्ये लो शुगर पेय म्हणून आपल्या खास आंबट-गोड संत्र्याच्या चवीसह परतले आहे. हे पेय त्या पिढीचे पुन्हा स्वागत करते, जे याच्यासोबत मोठे झाले आहेत आणि नवीन पिढीला आपलेसे करण्याचे आमंत्रण देते.
या रिलाँचसाठी क्विक-कॉमर्स-फर्स्ट दृष्टिकोन स्वीकारला जाईल, ज्यामध्ये ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट, झेप्टो, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि अॅमेझॉन नाऊ यांसारख्या आघाडीच्या प्लॅटफॉर्म्सवर गोल्ड स्पॉट उपलब्ध होईल. हा दृष्टिकोन या आयकॉनिक ब्रँडला आजच्या काळातील ग्राहक पसंती आणि खरेदीच्या सवयींशी जोडतो, ज्यामुळे जुने चाहते आणि पहिल्यांदाच आस्वाद घेणारे ग्राहक या दोघांनाही ‘द झिंग थिंग’ सहज उपलब्ध होईल.
गोल्ड स्पॉटच्या पुनरागमनासह, कोका-कोला इंडिया भारताच्या पेय इतिहासातील आयकॉनिक पेयाला पुन्हा सादर करत आहे, तसेच आजच्या ग्राहकांसाठी या पेयाची तीच अविस्मरणीय चव आणि उत्साह पुन्हा घेऊन येत आहे.


