Thursday, November 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedदूध हा शहरवासीयांसाठी दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा प्रथिनयुक्त स्त्रोत – गोदरेज जर्सीच्या ‘लॅक्टोग्राफ...

दूध हा शहरवासीयांसाठी दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा प्रथिनयुक्त स्त्रोत – गोदरेज जर्सीच्या ‘लॅक्टोग्राफ २.०’ चा निष्कर्ष

 

 

६९ टक्के भारतीयांना सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या प्रहारातही दूधाच्या सेवनाची सवय असल्याचे या अहवालाअंती उघडकीस आले आहे.

 

 

 

मुंबई, २६ नोव्हेंबर, २०२६ – दूध हा शहरी भागातील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. असंख्य मुंबईकर सकाळची चहा-कॉफीने करतात. रात्रीही त्यांना झोपण्यापूर्वी दूध लागते. मुंबईत दिवसभरात अनेकदा दूधाचा वापर केला जातो. दही, पनीर आणि ताक यांसारख्या नेहमीच्या पदार्थांद्वारेही दूधाचा नित्यनेमाने वापर केला जातो. अनेक ग्राहक दूध नियमितपणे सेवन करत असले तरीही त्यातील महत्त्वाच्या पोषक घटकांबद्दल अनभिज्ञ असल्याचे गोदरेज जर्सीच्या नव्या अभ्यासात उघडकीस आले आहे. दूधासंबंधित या महत्त्वाच्या बाबीकडे अनेकांचे दुर्लक्ष झाल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

गोदरेज जर्सी गेल्या वर्षापासून दूधातील पोषण द्रव्यांबद्दल वार्षिक अहवाल सादर करत आहे. कंपनीने गेल्या वर्षी राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्ताने पहिला ‘लॅक्टोग्राफ’ अहवाल प्रसिद्द केला होता. त्यानंतर यंदाच्या राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त गोदरेज जर्सीने ‘लॅक्टोग्राफ २.०’ हा नवा अहवाल जाहीर केला आहे. ‘युगव्ह’ या संस्थेने देशातील आठ शहरांमधअये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वापराबाबत हा अभ्यास केला आहे. दूधाचे सेवन केवळ सवयीपुरते मर्यादित नसून, त्याचे पोषण मूल्य महत्त्वाचे आहे, असे या अभ्यासात अधोरेखित करण्यात आले आहे. दूध हा शहरीवासीयांसाठी विश्वसनीय आणि किफायतशीर दरात उपलब्ध होणारे प्रथिन असल्याचेही अहवालातात मांडण्यात आले आहे.

 

 

 

दररोज किमान ६० टक्के लोक चहा आणि कॉफीतून दररोज, ४० टक्के लोक केवळ दूधाचे सेवन करतात. ६९ टक्के लोकांना दूध हा रोजच्या प्रथिनांचा परवडणारा स्त्रोत आहे. मुंबई आणि चेन्नईत ८० टक्के लोक दररोज दूध पितात. कंपनीने शहरवायींच्या दररोजच्या अन्नपदार्थांच्या सेवनातील प्रथिनांचे प्रमाण तपासले. यात दूध हे सर्वांच्या खिशाला परवडणारे प्रथिने असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. दूधात शरीरासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे नऊ अमीनो आम्ले असतात. त्यामुळे दूध हे प्रथिनयुक्त आम्ल पदार्थ आहे, हे ५९ टक्के लोकांना सर्वज्ञात असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

 

 

 

दूध हा शहरीवासीयांसाठी महत्त्वाचा प्रथिनयुक्त अन्नपदार्थ आहे. ८६ टक्के लोक आपल्या प्रथिनयुक्त स्त्रोतांमध्ये दूग्धजन्य अन्नपदार्थांचा समावेश करतात. ६५ टक्के लोकांना दूध हे सकस अन्न म्हणून प्रथिनयुक्त पदार्थ असल्याची धारणा आहे.

 

 

 

अनेकांना दूधापासून बनणा-या पदार्थांचे सेवन करायला आवडते. ६९ टक्के लोकांना पनीरमध्ये संपूर्ण प्रथिनयुक्त घटक असल्याचे ज्ञात आहे. ४७ टक्के लोकांना दही प्रथिनांचा मुख्य स्त्रोत असल्याची कल्पना आहे.

 

 

 

अनेक भारतीय परंपरा आणि चालीरितींमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. दूधाच्या सेवनाची सवय ही पिढ्यानपिढ्या सुरू आहे. शहरातील १० पैकी ९ जणांना लहानपणापासून दूध सेवनाची सवय आहे. यातील ५० टक्क्यांना दही-भात खायला आवडतो. उन्हाळ्याच्या ऋतुमानात ४९ टक्के लोक ताक आवर्जून पितात. खास प्रसंगात बदाम ४१ टक्के आणि सकाळी एक ग्लास दूध पिणारे ४० टक्केलोक आहेत. रात्री झोपताना ३९ टक्के जणांना दूधाच्या सेवनाची सवय आहे. ३६ टक्के हळदीचे दूध पितात. ही माहिती या अहवालात तपशीलवार दिली गेली आहे.

 

लॅक्टोग्राफ २.० च्या अहवालाबाबत गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “दूध हे सहज उपलब्ध होणारे अन्नपदार्थ आहे. लॅक्टोग्राफ २.० च्या अहवालानुसार, शहरी भागांतील ६९ टक्के लोकांना दूध हा रोजच्या प्रथिनांचा परवडणारा उपाय वाटतो. मात्र दुग्धजन्य पदार्थांचे खरे पोषणमूल्य लोकांना नीट समजावून सांगायला हवे. पोषण, चव आणि सोय यांबाबत लोकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेत, या जुन्या सवयी पुढे नेल्यास दुग्ध व्यवसाय बहरेल.”

 

 

 

देशात राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्ताने डॉ. वर्गीस कुरियन यांच्या कार्याची स्मरण केले जाते. तसेच त्यांच्या वारशाच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. या पार्श्वभूमीवर ‘लॅक्टोग्राफ २.०’ चा अहवाल महत्त्वाचा ठरतो. देशात अनेकांना दूध पिण्याची सवय असली तरीही या सवयीसोबत किफायतशीर दरात विश्वासार्ह प्रथिनांच्या सेवनांचा दररोजचा पर्याय उपलब्ध आहे, हे सांगणेही गरजेचे आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments