राष्ट्रीय, २० नोव्हेंबर २०२६: ‘हाऊस ऑफ टायटन’चे प्रमुख घड्याळ रिटेल ब्रँड्स असलेल्या ‘हेलिओस’ आणि ‘हेलिओस लक्स’ संपूर्ण भारतात आपले रिटेल नेटवर्क अधिक मजबूत करत आहेत. या दोन्ही ब्रँड्सनी २०३० पर्यंत एकूण ५०० स्टोअर्सचे संयुक्त नेटवर्क उभारण्याचे महत्त्वाकांक्षी व्हिजन ठेवले आहे. यामध्ये ४५ ते ५० ‘हेलिओस लक्स’ बुटीकचा समावेश असेल. देशभरातील चोखंदळ ग्राहकांसाठी प्रीमियम आणि लक्झरी घड्याळे अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी हे ब्रँड्स कटिबद्ध असल्याचे या विस्तारातून दिसून येते. या माध्यमातून नामांकित आंतरराष्ट्रीय आणि भारतीय घड्याळ निर्मात्यांचा विशाल पोर्टफोलिओ एकाच छताखाली उपलब्ध करून दिला जात आहे.
वेळ ही एकमेव अशी लक्झरी आहे, जी विकत घेता येत नाही किंवा एकदा गेली तर पुन्हा परत मिळवता येत नाही. त्यामुळे आपण आपला वेळ कशावर खर्च करतो, हे अधिक महत्त्वाचे ठरते. ‘हेलिओस लक्स’ची संपूर्ण संकल्पना याच विचारावर आधारित असून, आपल्या वेळेचा खऱ्या अर्थाने सन्मान करणाऱ्या खास गोष्टी आणि परंपरा जपण्यावर ब्रँडचा भर आहे. हाच विचार प्रत्यक्षात आणताना, ‘हेलिओस लक्स’ने अभिनेता जॉन अब्राहमसोबत मांडलेल्या या कथा आता पडद्यापलीकडे नेऊन थेट आपल्या बुटीकमध्ये आणल्या आहेत. या बुटीकना अशा खास अनुभव केंद्रांचे रूप दिले जात आहे, जिथे ग्राहकांना जगातील निवडक घड्याळ ब्रँड्सचा वारसा, डिझाईन आणि घड्याळ निर्मितीची उत्कृष्ट कला जवळून अनुभवता येईल.
भारतात घड्याळांच्या बाजारपेठेत सध्या मोठी तेजी पाहायला मिळत असून, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत या क्षेत्रात २५% वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे, या वाढीमध्ये प्रीमियम घड्याळांचा मोठा वाटा आहे. २५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घड्याळांच्या विभागात सुमारे ५८% वाढ झाली आहे, जी २५,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घड्याळांच्या तुलनेत जवळपास दुप्पट वेगाने होत आहे. यावरून ग्राहकांची पसंती बदलत असल्याचे दिसून येते; आजचा ग्राहक अधिक महागडे आणि प्रीमियम ब्रँड्स स्वीकारण्यास तसेच आपल्या घड्याळांच्या निवडीत काहीतरी वेगळे आणि खास शोधण्यास उत्सुक आहे. आपले विस्तृत रिटेल नेटवर्क, विविध ब्रँड्सचा पोर्टफोलिओ आणि ग्राहकांपर्यंत असलेली मजबूत पोहोच या जोरावर ‘हेलिओस’ या संधीचा लाभ घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ‘हेलिओस लक्स’ हे याच प्रवासाचे पुढचे पाऊल असून, घड्याळांची उत्तम जाण असलेल्या चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षा आणि उत्कृष्ट कारागिरी असलेल्या घड्याळांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ते उभारण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत दोन नवीन ‘हेलिओस लक्स’ बुटीक सुरू झाल्यामुळे, आता देशभरात या ब्रँडच्या बुटीकची संख्या १६ वर पोहोचली आहे. आपल्या या रिटेल नेटवर्कद्वारे ‘हेलिओस लक्स’ २० हून अधिक निवडक घड्याळ ब्रँड्सचा पोर्टफोलिओ ग्राहकांसाठी सादर करते. यामध्ये अलेक्झांडर शोरोखॉफ, यू-बोट, शॅरिओल, ओरिएंट स्टार आणि ऑगस्ट रेमंड यांसारख्या ९ एक्सक्लुझिव्ह ब्रँड्सचा समावेश आहे. यामुळे प्रीमियम आणि लक्झरी घड्याळांच्या बाजारपेठेत ब्रँडची वेगळी ओळख अधिक मजबूत झाली आहे. ‘हेलिओस लक्स’चा हा विस्तार भक्कम व्यवसाय वाढीच्या जोरावर होत असून, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत ‘हेलिओस’ आणि ‘हेलिओस लक्स’ने एकत्रितपणे ३५% वाढ नोंदवली आहे. यातून त्यांच्या रिटेल मॉडेलची ताकद आणि प्रीमियम व लक्झरी घड्याळांना ग्राहकांकडून मिळणारी वाढती पसंती स्पष्ट होते.
टायटन कंपनी लिमिटेडच्या वॉचेस डिव्हिजनचे व्हाइस प्रेसिडेंट आणि चीफ सेल्स अँड मार्केटिंग ऑफिसर राहुल शुक्ला म्हणाले, “घड्याळांच्या प्रत्येक ब्रँडची एक वेगळी ओळख आणि कहाणी असते, जी त्या ब्रँडचा वारसा, डिझाईनची शैली आणि उत्कृष्ट मेकॅनिकल तंत्रज्ञानाच्या ध्यासातून घडलेली असते. जॉन अब्राहम यांना असलेली इंजिनिअरिंगची आवड आणि कारीगरीबद्दलची सखोल जाण लक्षात घेता, या ब्रँड्सच्या खास गोष्टी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक उत्तम संधी आम्हाला दिसत आहे. ‘हेलिओस लक्स’बाबतही आमची हीच व्यापक संकल्पना आहे. या माध्यमातून आम्हाला असे एक वेगळे लक्झरी रिटेल ठिकाण उभारायचे आहे, जिथे नामांकित लक्झरी ब्रँड्स, स्वतंत्र घड्याळ निर्माते आणि घड्याळ निर्मितीच्या अनोख्या कलाकृती एकाच छताखाली पाहायला मिळतील. आमचा विस्तार वाढत असताना, सर्वोत्तम ब्रँड्स निवडण्यावर आणि ग्राहकांना उत्कृष्ट घड्याळांच्या जगाशी अधिक जवळून जोडणारे खास अनुभव देण्यावर आमचा कायम भर राहील.”
या रिटेल विस्ताराला पूरक म्हणून, ‘हेलिओस लक्स’ आपल्या नव्या ‘स्टोरीज दॅट डिझर्व्ह युवर टाइम’ (Stories That Deserve Your Time) या मोहिमेद्वारे घड्याळांच्या जगाशी ग्राहकांचे नाते अधिक घट्ट करत आहे. यामध्ये अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहम सूत्रधाराच्या भूमिकेत दिसत आहे. घड्याळाच्या केवळ तांत्रिक वैशिष्ट्यांच्या पलीकडे जाऊन, ही मोहीम निवडक आंतरराष्ट्रीय घड्याळ ब्रँड्सचा वारसा, कारागिरी, डिझाईनची शैली आणि त्यांची सर्जनशील दृष्टी उलगडून दाखवते. प्रत्येक ब्रँडला खास बनवणाऱ्या या रंजक गोष्टी जॉन आपल्या शैलीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत.
जॉन अब्राहम यांनी या मोहिमेविषयी सांगितले, “घड्याळ निर्मितीमध्ये मला सर्वात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक घड्याळ तयार करण्यामागे असलेली अचूकता, इंजिनिअरिंग आणि उत्कृष्ट कारागिरी. मोटारसायकली आणि यंत्रसामग्री हे माझे आवडीचे विषय असल्याने मला नेहमीच अशा गोष्टींमागील गुंतागुंतीची यंत्रणा आणि बारीक तपशिलांचे कौतुक वाटत आले आहे, ज्याकडे आपण अनेकदा सहज दुर्लक्ष करतो. या मोहिमेच्या माध्यमातून विविध घड्याळ निर्मात्यांच्या स्वतंत्र गोष्टी आणि त्यांची विचारसरणी जाणून घेणे हा एक अतिशय रंजक अनुभव होता. प्रत्येक घड्याळाची स्वतःची एक कहाणी असते, जी त्याचा वारसा, सर्जनशीलता आणि त्यामागे काम करणाऱ्या लोकांमुळे घडलेली असते. ‘हेलिओस लक्स’चे ही दोन नवीन बुटीक्स घड्याळ निर्मितीच्या या वेगवेगळ्या विश्वांना अतिशय सुंदरपणे एकत्र आणतात, ज्यामुळे घड्याळांच्या शौकिनांना त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि त्यांची प्रशंसा करण्याची संधी मिळते.”
देशभरात विस्तारणारे जाळे, निवडक घड्याळ ब्रँड्सचा वाढता पोर्टफोलिओ आणि कहाण्या, खास गोष्टी, अनुभव सांगण्यावर दिलेला अधिक भर या जोरावर ‘हेलिओस लक्स’ भारतातील प्रीमियम आणि लक्झरी घड्याळांच्या रिटेल बाजारपेठेचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले आहे. घड्याळ निर्मिती आणि डिझाईनचे विश्व एकत्र आणत, हा ब्रँड असे एक खास ठिकाण घडवत आहे जिथे प्रत्येक घड्याळामागे जाणून घेण्यासारखी एक रंजक गो
ष्ट दडलेली आहे.


