Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedएका भावाचा त्याग, कुटुंबाची गुपितं तसेच सत्यासाठीची लढाईः प्राईम व्हीडिओ’च्या वतीने एमएक्स...

एका भावाचा त्याग, कुटुंबाची गुपितं तसेच सत्यासाठीची लढाईः प्राईम व्हीडिओ’च्या वतीने एमएक्स ओरिजिनल किसका कसूर’चा ट्रेलर प्रदर्शित

 

~ बंधुत्व, विश्वासघात आणि सूडबुद्धीची एक मनोरंजक कथा, ‘किसका कसूर’चा प्रीमियर 2 डिसेंबर 2026 रोजी प्राईम व्हिडिओवर विनामूल्य स्ट्रीम होणार ~

 

Link – https://youtu.be/HPAKV8oahqc

 

मुंबई, भारत – 27 नोव्हेंबर, 2026: काही बंधांची कसोटी परिस्थितीनुसार होते; तर काही बंध बलिदानाच्या कृतीमुळे तुटतात. दोन वर्षांच्या तुरुंगवासाची किंमत मोजूनही जेव्हा निष्ठा जिवंत राहते, तेव्हा तिची खरी किंमत कोण मोजतो? ओरिजिनल्ससाठी खास भारतातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा असलेल्या प्राईम व्हीडिओने आज आगामी एमएक्स ओरिजिनल किसका कसूर या कौटुंबिक गुन्हेगारी नाट्यपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. जो बंधुत्व, त्याग आणि विश्वासघाताच्या गुंतागुंतीच्या समीकरणाचा शोध घेतो. ‘रक्षक 2’ आणि ‘मत्स्य कांड’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या अजय भुयान दिग्दर्शित आणि टेम्पल बेल्स फिल्म्सच्या प्रत्युषा जयप्रकाश तसेच उज्ज्वल आनंद निर्मित या मालिकेत अरिजीत तनेजा, पुलकित मकोल, प्रणाली राठोड, कशिश कपूर, विवेक मुशरान आणि सुचिता त्रिवेदी यांचा समावेश आहे.

 

 

 

‘किसका कसूर’च्या ट्रेलरमध्ये आदित्य तसेच अनुज ही जुळी भावंड प्रेक्षकांच्या भेटीला येतील. ज्यांचे बंध रक्ताने बांधले गेले आहेत. परंतु त्यांच्या कुटुंबात त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे विभक्त झाले आहेत. आयुष्यात चूक न करणारा मुलगा म्हणून आदित्यकडे पाहिले जाते, तर अनुजला अनेकदा काळ्या मेंढ्याप्रमाणे वागवले जाते. मात्र अपघाताने लवकरच त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळते. ज्यासाठी अनुज त्याच्या भावाला दोषी ठरवतो. भावाला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची किंमत मोजावी लागते. तथापि, निष्ठा, संताप आणि विश्वासघात यांच्यातील नाते मागे सोडून, त्या बलिदानाला त्याच्या स्वातंत्र्यापेक्षा खूप जास्त किंमत मोजावी लागते. आजवर दडपून राहिलेली सत्य प्रकाशात येतात; तसतशा योग्य आणि अयोग्य यांच्यातील रेषा अस्पष्ट होऊ लागतात. ज्या जगात रक्ताच्या बंधाचे कडव्या वैमनस्यात रूपांतर होऊ शकते, त्या जगात अनुज आणि आदी हे दोघे भावंडं, मित्र किंवा शत्रू अशा तिहेरी कचाट्यात अडकतील का? जेव्हा सत्य समोर येईल, तेव्हा नेमका दोषी कोण ठरेल?

 

 

 

प्राईम व्हीडिओ इंडिया’चे एव्हीओडी डायरेक्टर आणि कंटेंट हेड अमोघ दुसाद म्हणालेः “किसका कसूर कौटुंबिक नातेसंबंधांच्या गुंतागुंतींचा शोध घेते, जिथे अपेक्षा, निष्ठा आणि वैयक्तिक निवडी अनेकदा अनपेक्षित परिणामांना कारणीभूत ठरू शकतात. ही कथा कौटुंबिक नाटकाची भावनिक सखोलता गुन्हेगारीच्या कथानकाच्या कारस्थानासह एकत्र आणते. ज्यामुळे एक आकर्षक दृश्य बनते. टेम्पल बेल्स फिल्म्स आणि दिग्दर्शक अजय भुयान यांच्या सहकार्याने प्रतिभावान कलाकारांच्या टीमने साकारलेल्या कथेवर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

 

 

 

 

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना, अरिजित तनेजा म्हणाला, “अनुज या व्यक्तिरेखेला मनोरंजक बनवणारी गोष्ट म्हणजे त्याचे कुटुंबाशी किंवा त्याच्या सभोवतालच्या जगाशी सोपे समीकरण अजिबात नाही. त्याने स्वत:च्या आयुष्याचा बराचसा काळ न्यायनिवाडा आणि तुलना करण्यात घालवला आहे. परंतु त्याच्या बंडखोरी व्यतिरिक्त तो अशी व्यक्ती आहे जी स्वत:वर प्रेम करणाऱ्या लोकांना खूप महत्त्व देते. आपल्या भावाला दोष देण्याचा त्याचा निर्णय त्याच्या जीवनाचा मार्ग बदलण्याकरिता कारणीभूत ठरतो. त्यानंतर नुकसान, राग आणि ज्या जगाने आधीच त्याचा न्याय केला आहे त्या जगात स्वत:चे स्थान शोधण्याचा प्रयत्न आहे. अनुज’ची भूमिका साकारताना मला अनेक भावनिक छटा शोधण्याचे आव्हान मिळाले. ज्यामुळे ही व्यक्तिरेखा विशेषतः ‘हटके’ ठरली.”

 

 

 

 

या मालिकेत काम करण्याचा अनुभव सांगताना पुलकित मकोल म्हणाला, “किसका कसूर’च्या सर्वात फायद्याच्या पैलूंपैकी एक म्हणजे प्रत्येक पात्राला कथेत वेगळे स्थान असलेल्या टीमचा भाग असणे. अरिजीत, प्रणाली आणि इतर कलाकारांसोबत काम करणे तसेच अजय भुयान यांच्यासारख्या दिग्दर्शकाचे मार्गदर्शन हा अनुभव विशेषतः संस्मरणीय ठरला. आदीच्या अनुजाशी असलेल्या नात्याचे अनेक कंगोरे आहेत आणि पात्राची गुंतागुंत समोर आणताना त्या समीकरणांचा शोध घेणे ही एक मनोरंजक प्रक्रिया होती. सेटवरील वातावरण आणि संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा एक असा प्रोजेक्ट बनला ज्याकडे मी नेहमीच प्रेमळपणे मागे वळून बघेन.”

 

 

 

 

सौंदर्याची व्यक्तिरेखा साकारणारी प्रणाली राठोड पुढे म्हणाली, “सौंदर्या दोन भावांमधील गुंतागुंतीच्या समीकरणात अडकते, जिथे प्रेम, निष्ठा आणि सत्य यांच्यात सतत मतभेद असतात. मला तिच्या प्रवासाबद्दल भावलेली गोष्ट म्हणजे ती केवळ तिच्या नातेसंबंधांना ‘नेव्हिगेट’ करत नाही तर ती तिच्या स्वतःच्या भावना आणि तिच्या सभोवतालच्या लोकांनी केलेल्या निवडीचे परिणाम देखील हाताळत आहे. कथा जसजशी पुढे सरकते तसतसे तिच्या पात्राचे अनेक पदर उलगडतात. त्या भावनिक बदलांचा शोध घेणे हा एक समाधानकारक अनुभव होता. हा प्रकल्प माझ्यासाठी विशेष आहे. कारण यात मुख्य भूमिका साकारणारी माझी पहिली स्ट्रीमिंग सिरीज आहे. ज्यामुळे मला एक कलाकार म्हणून माझ्या प्रवासाचा पूर्णपणे नवीन आयाम शोधता येतो. प्रेक्षक माझ्या या नव्या बाजूचा अनुभव कधी घेतील याकरिता मी उत्सुक आहे.”

 

 

एमएक्स ओरिजिनल किसका कसूर दिनांक 2 डिसेंबर 2026 पासून प्राईम व्हीडिओवर तसेच एमएक्स प्लेयरवर प्राईम व्हीडिओ अँड्रॉइड अॅपवर (पूर्वी अमेझॉन एमएक्स प्लेयर म्हणून प्रसिद्ध) स्ट्रीम होईल. एमएक्स प्लेयर बाय प्राईम व्हीडिओ ही भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-पाठबळ लाभलेली व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवा आहे. जी मोबाईल उपकरणे, कनेक्टेड टीव्ही, अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ आणि

फायर टीव्हीवर उपलब्ध आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments