पिंपरी, पुणे (दि.२२ डिसेंबर २०२३) पालकांनी शाळेची निवड करताना जशी चिकित्सा केली जाते त्याचप्रमाणे कला, क्रीडा प्रशिक्षण घेण्यासाठी चांगल्या गुरूची निवड करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती हीच खरी संस्कृती आहे. कलोपासनेतून स्वानंद मिळतो, त्यामुळे मनाची एकाग्रता साधता येते. कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत. रियाजाने कला समृद्ध होत जाते असे मार्गदर्शन ज्येष्ठ नृत्य कलाकार व मार्गदर्शिका वैशाली पळसुले यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी शाळेचे स्नेहसंमेलन आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ सदस्य सुधीर काळकर, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
आपला देश प्रगतीपथावर आहे. आर्थिक, विज्ञान तंत्रज्ञान, संस्कृती, परंपरा, सामाजिक विकास यामध्ये प्रगती करत आहे. भारताचा येथून पुढील काळ सुवर्णकाळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३२५ वर्षे पूर्ण झाली आणि या नवीन वर्षाच्या प्रारंभी अयोध्येत श्रीराम लल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. युवकांचा देश अशी आपली ओळख निर्माण झाली असून, आजची तरुण पिढी अत्यंत हुशार आहे. वसुधैव कुटुंबकम या आपल्या संस्कृतीतून संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आयुष्याचे उद्दीष्ट, कठोर परिश्रम, चिकीत्सक वृत्ती, अभ्यासातील अष्टपैलूत्व, संघटीत शक्ती या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे सुधीर काळकर यांनी सांगितले.
चार दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील लोकनृत्ये आणि राष्ट्रभक्ती नृत्य सादर केली. तसेच ऐतिहासिक व्यक्ती, नद्या, ऋतू आणि क्रीडांगणा वरील खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कलाकार पूजा डोळस, सचिन काळभोर आणि सुवर्णा बाग यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले.
अमृता कर्नेल यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन श्रुती पंडित तसेच विद्यार्थी मानसी गवंडगावे, गायत्री काळे, निहाल सिंग, चिन्मयी अमीन, निशांत सरदेशमुख आणि अनुष्का भोर यांनी केले. दिनदर्शिका प्रकाशन कमिटी मध्ये सुषमा तागरे, वैभवी फडके, हेमा रामराज, उमा कुलकर्णी, स्वाती देशपांडे आणि स्मृती पंडित, मोनिका बोरसे, सोनाली देशमुख, अमृता दरेकर यांनी काम पाहिले.
स्वागत, आभार सुनीता बालसुनी, कविता फापाळे, ज्योती मोरे व पूजा कुलकर्णी यांनी मानले.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार, शिक्षिका श्रुती पंडित, रुचिका भट, सुजाता भोंगे, वैभवी फडके, उमा कुलकर्णी, पूजा कुलकर्णी, ज्योती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
————————————
कलोपासनेतून मिळतो स्वानंद – वैशाली पळसुले शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन
Share with
Tagged in :