नाही. रविंद्र धंगेकर यांना संसदेत पाठवून पुण्याचा विकास ते करणार आहेत. सामन्यांचे प्रश्न धंगेकर सोडवणार आहेत. जनता त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला.
चंद्रकांत हंडोरे म्हणाले, रविंद्र धंगेकर यांनी कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचा किल्ला ढासळून टाकला आहे. आता धंगेकर लोकसभेत विक्रमी मताने नक्की निवडून येणार. भाजपच्या भूलथापांना नागरिक बळी पडणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली. गॅसची दरवाढ झाली. मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपची ही फक्त जुमलेबाजी होती. राज्यघटनेने मुलभूत अधिकार, समानता दिली. राज्यघटना दीपस्तंभा सारखी मार्गदर्शन करीत आहे. या सत्ताधाऱ्यांनी न्याय व्यवस्था धोक्यात आणली आहे असे ते यावेळी म्हणाले.
या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


