Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅमेझॉन मिनीटीव्ही घेऊन येत आहे ‘अँबर गर्ल्स स्कूल’, किशोरवयीन जीवनातील गुंतागुंत दाखवणारी...

अॅमेझॉन मिनीटीव्ही घेऊन येत आहे ‘अँबर गर्ल्स स्कूल’, किशोरवयीन जीवनातील गुंतागुंत दाखवणारी धमाल सीरीज

रिलायन्स एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या ‘अँबर गर्ल्स स्कूल’मध्ये पाहायला मिळणार ऑस्कर विजेत्या लेखक गरिमा पुरा पाटियालवी लिखित भावस्पर्शी गोष्ट

 

~ अँबर गर्ल्स स्कूल 1 मे 2024 पासून फक्त अॅमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत पाहता येणार

 

मुंबई, 27thएप्रिल, 2024 – अॅमेझॉन मिनीटीव्ही या अॅमेझॉनच्या मोफत व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेद्वारे मैत्री, स्वतःचा शोध आणि टीनएज मुलींच्या आयुष्यातली गुंतागुंत यांवर आधारित आकर्षक सीरीज लवकरच स्ट्रीम केली

जाणार आहे. अँबर स्कूल गर्ल्स असे नाव असलेल्या या शो मध्ये किशोरवयीन मुलींची वयात येतानाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या शो चा लक्षवेधी ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून त्यामध्ये अँबर गर्ल्स स्कूल (एजीएस) या मुलींच्या शाळेतल्या दुनियेची झलक पाहायला मिळते. ‘संस्कारी’ मुली घडवण्याची परंपरा असलेल्या या शाळेत परंपरा आणि स्वातंत्र्याची आस यांच्यात टक्कर होताना दिसते. ही आगामी सीरीज प्रेक्षकांना त्यातलं कटु वास्तव, किशोरवयातला संघर्ष आणि जबरदस्त व्यक्तिरेखा यांच्या माध्यमातून खिळवून ठेवेल. रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सीरीजचं दिग्दर्शन राजलक्ष्मी रतन सेठ यांनी केलं असून त्यात सेलेस्टी बैरागे, काजल चौघ, अद्रिजा सिन्हा, इशिका गगनेजा, हर्ष खुराना आणि श्रृती पनवार मुख्य भूमिकेत दिसतील. या सीरीजचं लेखन प्रसिद्ध लेखक गरिमा पुरा पटियालवी यांनी केलं असून त्या 2022 ऑस्कर विजेती माहितीपट ‘एलिफंट व्हिसपरर’साठी प्रसिद्ध आहेत.

 

या ट्रेलरमध्ये ओजस्विनी या 15 वर्षांच्या साध्या- सरळ, संस्कारी मुलीची गोष्ट पाहायला मिळते, जी अभ्यासात खूप हुशार असते. शाळेत व्हाइस हेड गर्ल बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी शिस्तीने वागत असते, मात्र किशोरवयात आल्यावर चित्र बदलतं. ‘मोठ्यांच्या’ गोष्टी आजमावून पाहाण्यापासून घरातल्या आर्थिक अडचणींपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींमुळे ओजस्विनीचा गोंधळ होतो. टीनएज वयातल्या आव्हानांचा सामना कसा करावा हे तिला समजत नसतं. या प्रवासातल्या अडचणींमधून ती कशी वाट काढते हे या शो मध्ये रंजक पद्धतीनं मांडण्यात आलं आहे.

 

‘आमच्या कंटेंटमध्ये आणखी एका आकर्षक गोष्टीचा समावेश करत प्रेक्षकांना दर्जेदार व वैविध्यपूर्ण कंटेंट उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. अँबर गर्ल्स स्कूलमध्ये टीनएजमधले दिवस अगदी योग्य पद्धतीने मांडण्यात आले आहेत. आपली ओळख शोधताना होणारी गुंतागुंत, मैत्री, बंडखोरी अशा वेगवेगळ्या भावना यात चांगल्या प्रकारे दाखवण्यात आल्या आहेत,’ असे अॅमेझॉन मिनीटीव्हीचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद म्हणाले.

‘1 मे 2024 रोजी प्रेक्षकांना अँबर गर्ल्स स्कूल उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे रिलायन्स एंटरटमेनमेंटच्या निर्मात्या स्वेता अग्नीहोत्री म्हणाल्या. ‘सगळ्या जगभरातील टीनएजर्समध्ये दिसून येणारा संघर्ष या सीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. जबरदस्त कलाकार आणि टीममुळे ही सीरीज प्रेक्षकांवर कायमस्वरूपी प्रभाव टाकेल असे वाटते.’

ओजस्विनीची भूमिका करत असलेली सेलेस्टी बैरागे म्हणाली, ‘अँबर गर्ल्स स्कूलमध्ये सहभागी होण्याची तसंच ओजस्विनीची व्यक्तीरेखा साकारण्याची संधी माझ्यासाठी सन्माननीय आहे. ही सीरीज टीनएज वयाचा अनुभव नेमकेपणानं मांडणारी आहे. स्वातंत्र्य आणि स्वशोधाच्या दिशेने होणारा ओजस्विनीचा प्रवास प्रत्येक प्रेक्षकाला आपलासा वाटेल. या सीरीजमधल्या इतर गुणवत्तापूर्ण कलाकारांबरोबर काम करणं अविस्मरणीय अनुभव होता. प्रेक्षक आमच्याबरोबर या साहसी तरीही आपल्या वाटणाऱ्या प्रवासाचा आनंद घेतील अशी आशा वाटते.’

अँबर गर्ल्स स्कूलचे प्रीमियर 1 मे 2024 रोजी होणार असून ही सीरीज अॅमेझॉन शॉपिंग अ‍ॅपमधील अॅमेझॉन मिनीटीव्हीवर मोफत, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्हीवर पाहाता येईल किंवा प्लेस्टोअरवर अ‍ॅप डाउनलोड

करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments