Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगचा भारतात २०२४ निओ क्‍यूएलईडी आणि ओएलईडी एआय टेलिव्हिजन्‍स लाँच करत टीव्‍ही...

सॅमसंगचा भारतात २०२४ निओ क्‍यूएलईडी आणि ओएलईडी एआय टेलिव्हिजन्‍स लाँच करत टीव्‍ही व्‍यवसायामधून १०,००० कोटी रूपयांची विक्री संपादित करण्‍याचा संकल्‍प

गुरूग्राम, भारत – मे २, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडचा एआय टेलिव्हिजन्‍सच्‍या २०२४ लाइनअपच्‍या लाँचसह भारतातील त्‍यांच्‍या टेलिव्हिजन व्‍यवसायासाठी १०,००० कोटी रूपयांच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठण्‍याचा संकल्‍प आहे. विश्‍लेषकांच्‍या मते, आतापर्यंत भारतातील इतर कोणत्‍याही टेलिव्हिजन ब्रँडने हा उल्‍लेखनीय टप्‍पा गाठलेला नाही.

 

”आमच्‍या एआय-पॉवर्ड ८के निओ क्‍यूएलईडी, ४के निओ क्‍यूएलईडी आणि ओएलईडी टीव्‍हींच्‍या आमच्‍या नवीन श्रेणीच्‍या लाँचसह आम्‍हाला या वर्षातील भारतातील आमच्‍या महसूलामध्‍ये वाढ करण्‍याचा आणि आमचे बाजारपेठ नेतृत्‍व अधिक दृढ होण्‍याचा विश्वास आहे. २०२४ मध्‍ये आम्‍ही भारतातील आमच्‍या टीव्‍ही व्‍यवसायामधून महसूलामध्‍ये १०,००० कोटी रूपयांचा टप्‍पा गाठण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. आमच्‍या निओ क्‍यूएलईडी ८के एआय टीव्‍ही वास्‍तविक पिक्‍चर क्‍वॉलिटी आणि प्रीमियम ऑडिओच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम व्‍युइंग अनुभवाची खात्री देतात,” असे सॅमसंग इंडियाच्‍या व्हिज्‍युअल डिस्‍प्‍ले बिझनेसचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.

 

संशोधन कंपनी ओमडियाच्‍या डेटानुसार, सॅमसंग २०२३ पर्यंत २१ टक्‍के व्‍हॉल्‍यूम मार्केट शेअरसह भारतातील पहिल्‍या क्रमांकाचा टेलिव्हिजन ब्रँड आहे. ओमडियाच्‍या मते, सॅमसंग गेल्‍या पाच वर्षामध्‍ये भारतातील सर्वात मोठा टीव्‍ही ब्रँड आहे.

 

नवीन लाँच करण्‍यात आलेले निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ग्‍लेअर-फ्री ओएलईडी टीव्‍हींमध्‍ये आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय)ची परिवर्तनात्‍मक क्षमता आहे, ज्‍यामुळे ग्राहकांची जीवनशैली सुधारण्‍यास मदत होते, असे सॅमसंगने सांगितले. नवीन एआय-पॉवर्ड निओ क्‍यूएलईडी ८के, निओ क्‍यूएलईडी ४के आणि ओएलईडी टीव्‍ही होम एंटरटेन्‍मेंट अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जातात आणि एआयच्‍या क्षमतेसह उपलब्‍धता, शाश्‍वतता व सुधारित सुरक्षिततेमध्‍ये नवीन इनोव्‍हेशन्‍स देतात.

 

सॅमसंगच्‍या नवीन एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्‍समध्‍ये एआय पिक्‍चर टेक्‍नॉलॉजी, एआय अपस्‍केलिंग प्रो आणि एआय मोशन एन्‍हान्‍सर प्रो अशी विविध एआय वैशिष्‍ट्ये आहेत. एआय एनर्जी मोडसह ग्राहक पिक्‍चर क्‍वॉलिटीबाबत तडजोड न करता पॉवर सेव्‍ह करू शकतात.

 

सॅमसंग निओ क्‍यूएलईडी ८के दोन मॉडेल्‍स QN900D व QN800D मध्‍ये आणि ६५ इंच, ७५ इंच व ८५ इंच आकारामध्‍ये उपलब्‍ध आहे. निओ क्‍यूएलईडी ४के दोन मॉडेल्‍स QN85D व QN90D मध्‍ये आणि ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ८५ इंच व ९५ इंच आकारामध्‍ये उपलब्‍ध आहे. सॅमसंग ओएलईडी टीव्‍ही दोन मॉडेल्‍स S95D व S90D मध्‍ये आणि ५५ इंच, ६५ इंच, ७७ इंच व ८३ इंच आकारामध्‍ये उपलब्‍ध असेल.

 

नवीन सॅमसंग टेलिव्हिजन्‍ससह वापरकर्त्‍यांना समाधान मिळू शकते, जेथे हे टेलिव्हिजन्‍स सॅमसंग नॉक्‍ससह येतात, जे प्रत्‍येक वैशिष्‍ट्य, अॅप व प्‍लॅटफॉर्मचे संरक्षण करते.

 

• सॅमसंगच्‍या निओ क्‍यूएलईडी ८के श्रेणीची किंमत ३,१९,९९० रूपयांपासून सुरू होते.

 

• सॅमसंगच्‍या निओ क्‍यूएलईडी ४के श्रेणीची किंमत १,३९,९९० रूपयांपासून सुरू होते.

 

• सॅमसंगच्‍या ओएलईडी श्रेणीची किंमत १,६४,९९० रूपयांपासून सुरू होते.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments