Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहार्ड रॉक कॅफेचा सायकल फेरीत सक्रिय सहभाग 'विथ लव्ह चॅरिटेबल...

हार्ड रॉक कॅफेचा सायकल फेरीत सक्रिय सहभाग ‘विथ लव्ह चॅरिटेबल फाउंडेशन’ द्वारे आयोजित फीड फॉरवर्डसाठी वीकेंड रायडर्ससोबत भागीदारी गरजूंना अन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात उत्साही सायकलस्वार

पुणे मे २०२४: प्रसिद्ध हार्ड रॉक कॅफेने (HRC) `फीड फॉरवर्ड’ च्या सहकार्याने,’विथ लव्ह चॅरिटेबल फाउंडेशन’ द्वारे आयोजित ‘वीकेंड रायडर्स’ सोबत एका ऐतिहासिक सामाजिक उपक्रम राबवला. फूड इंडस्ट्रीशी सहकार्य करून गरजूंना अन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात उत्साही सायकलस्वार आणि इतिहासप्रेमी, हार्ड रॉक कॅफेच्या बॅनरखाली एकत्र आले होते. या सर्वांनी पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन अन्न वाया न घालवण्याबाबत आणि ते गरजूंना पोहोचविण्याबाबत जनजागृती केली.

 

मगरपट्टा परिसरातील गरजू, वंचितांना मदत करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीकेंड रायडर्स गटातील ७० हून अधिक सायकलस्वार यात सहभागी झाले होते. सामाजिक जबाबदारी आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी एकत्र येऊन आपली वचनबद्धता दर्शविली.

 

जेएसएम कॉर्पोरेशन प्रा. लि. च्या विपणन प्रमुख निधी देसाई यांनी फीड फॉरवर्ड आणि वीकेंड रायडर्सच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “ या उपक्रमातून गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची हार्ड रॉक कॅफेची वचनबद्धता अधोरेखित होते. अशा प्रभावी कार्याचा भाग बनणे, आमच्या संसाधनांचा लाभ घेणे आणि सकारात्मक बदलांना चालना देण्यासाठी समर्पित भावनेने काम करणे ही आमच्यासाठी बहुमानाची बाब आहे. अन्न असुरक्षितता दूर करण्यासाठी आणि उपेक्षित समुदायासाठी पुढाकार घेण्याकरिता फीड फॉरवर्डबरोबर हार्ड रॉक कॅफे कटिबद्ध आहे. वंचितांबाबत सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारी जाणीव या आमच्या सामायिक मूल्यांना मूर्त स्वरुप देण्यासाठी आम्ही संयुक्तपणे कार्यरत आहोत. ”

 

या उपक्रमाचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, विथ लव्ह चॅरिटेबल फाउंडेशनच्या संस्थापक डिंपल सोमजी म्हणाल्या, ” या उपक्रमाचा एक भाग होण्याची संधी मिळणे हा आमचा बहुमान आहे. अन्न उद्योगातील म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी असलेले अतिरिक्त अन्न जमा करून ते गरजूंना देणे हे आमचे ध्येय आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून हे काम करून उपेक्षित समुदायात सकारात्मकता निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

 

विथ लव्ह चॅरिटेबल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली फीड फॉरवर्ड, गरजूंना जेवण पुरवताना अन्नाची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करते. या भागीदारीद्वारे, हार्ड रॉक कॅफेने अन्न असुरक्षिततेचे निराकरण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याप्रति आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे

.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments