साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्यतृतीया हा शुभ दिवस संपूर्ण भारतभरात खरेदीसाठी एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. उत्तर,दक्षिण आणि पश्चिम भागांसह भारतभरात हा सण साजरा केला जातो. हा दिवस लग्नसराईच्या काळात येत असल्याने गुढीपाडव्याप्रमाणेच खरेदीसाठी लोकांचा उत्साह असेल. अक्षय्यतृतीयेला मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते आणि ग्राहकांमध्ये सोने खरेदी हा सर्वांत पसंतीचा पर्याय असतो. सोन्याला विश्वासार्हता असून या दिवशी सोने खरेदी ही शुभ मानली जाते.या सगळ्या गोष्टी लक्षात घेता अक्षय्यतृतीयेला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केली.
मुल्याच्या दृष्टीने सोन्याची किंमत वाढल्याने विक्री गेल्या वर्षीपेक्षा अधिक राहिल अशी शक्यता आहे,त्याचबरोबर विक्रीच्या प्रमाणात देखील वाढ होण्याची अपेक्षा आहे.एकंदर उद्योगाचा विचार करायचा झाला तर गेल्या वर्षीपेक्षा प्रमाणाच्या दृष्टीने अंदाजे 10 ते 15 टक्के वाढ आणि मुल्याच्या दृष्टीने 35 ते 40 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे
.


