Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorized-मजूर अड्डा रहाटणी फाटा, मतदार जनजागृती अभियान

-मजूर अड्डा रहाटणी फाटा, मतदार जनजागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दीपक सिंगला, ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली मजूर अड्डा रहाटणी फाटा येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मजूर मतदार नागरीक यांना निवडणूकीत मतदान करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. २०५ चिंचवड विधानसभा मतदार स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री.राजाराम सरगर व स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित राहून मजूर मतदार नागरीकांकडून मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments