Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोला इंडियाने नॅशनल विमेन्‍स हॉकी लीगसाठी पहिल्‍यांदाच हॉकी इंडियासोबत केली हातमिळवणी

कोका-कोला इंडियाने नॅशनल विमेन्‍स हॉकी लीगसाठी पहिल्‍यांदाच हॉकी इंडियासोबत केली हातमिळवणी

 

मे ७, २०२४: कोका-कोला इंडिया फाऊंडेशन ‘आनंदन’ने नॅशनल विमेन्‍स हॉकी लीग २०२४ साठी पहिल्‍यांदाच हॉकी इंडियासोबत सहयोगाची घोषणा केली आहे. या टूर्नामेंटचा पहिला टप्‍पा रांची, झारखंड येथे ३० एप्रिलपासून सुरू झाला आहे आणि ९ मे २०२४ रोजी समाप्‍त होईल. ही देशांतर्गत लीग टॅलेंट व कौशल्‍याच्‍या उत्‍साही प्रदर्शनाची खात्री देते.

 

नॅशनल विमेन्‍स हॉकी लीगमध्‍ये नुकतेच पुण्‍यात समाप्‍त झालेल्‍या १४व्‍या हॉकी इंडिया सीनियर विमेन नॅशनल चॅम्पियनशीप २०२४ मधील अव्‍वल आठ स्‍थान पटकवणाऱ्या संघांचा समावेश आहे. सहभागी खेळाडू हरियाणा, महाराष्‍ट्र, झारखंड, मध्‍यप्रदेश, बंगाल, मिझोराम, मणिपूर आणि ओडिशा अशा विविध राज्‍यांचे प्रतिनिधीत्‍व करतात.

 

कोका-कोला इंडियाच्‍या क्रीडाप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत या तीन वर्षांच्‍या सहयोगामधून क्रीडा व लैंगिक समानता लँडस्‍केपला सकारात्‍मकपणे आकार देण्‍यामध्‍ये कंपनीची भूमिका दिसून येते. हा सहयोग कंपनीच्‍या #SheTheDifference मोहिमेशी देखील संलग्‍न आहे. ही मोहिम महिलांना प्रशंसित करणे, त्‍यांची प्रगती करणे आणि त्‍यांना पाठिंबा देणे याप्रती उपक्रम आहे. या धोरणात्‍मक सहयोगाचा विशेषीकृत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण उपकरणाची तरतूद, पोषण साह्य आणि विकासाला चालना देण्‍यासाठी शिबिरे व टूर्नामेंट्सचे आयोजन अशा आवश्‍यक घटकांची पूर्तता करत महिला हॉकी प्रगत करण्‍याचा मनसुबा आहे.

 

स्‍पोर्टिंग इथोज उपक्रमाची अंमलबजावणी सहयोगी आहे, जी खेळाडूंना त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमता संपादित करण्‍यास आणि सर्वोत्तम भारतीय खेळाला सादर करण्‍यास बहुमूल्‍य पाठिंबा देते.

 

या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की म्‍हणाले, “आम्‍हाला टूर्नामेंटच्‍या पहिल्‍याच एडिशनसाठी कोका-कोला इंडिया फाऊंडेशन आनंदनसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. माझा विश्‍वास आहे की हा सहयोग खेळ म्‍हणून हॉकीचा दर्जा, तसेच राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर महिला हॉकी खेळाडूंचा दर्जा देखील उंचावेल. हा सहयोग क्रीडा प्रशिक्षणाचा स्‍तर उंचावण्‍यासोबत भारतातील क्रीडा क्षमता उंचावण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण ठरेल.”

 

अध्‍यक्षांच्‍या उत्‍साही मताला दुजोरा देत हॉकी इंडियाचे महासचिव श्री. भोलानाथ सिंग यांनी कोका-कोला इंडिया फाऊंडेशन आनंदनसोबतच्‍या सहयोगाचे स्‍वागत केले. ते म्‍हणाले, “आमची ध्‍येये परिपूर्णपणे संलग्‍न आहेत. हॉकी इंडिया आणि कोका-कोला तळागाळापासून क्रीडाला, विशेषत: महिला हॉकीला प्रोत्‍साहन देण्‍यास व विकसित करण्‍यास कटिबद्ध आहेत. आम्‍ही नॅशनल विमेन्‍स हॉकी लीगकडे राष्‍ट्रीय संघासाठी प्रबळ फीडर सिस्‍टम म्‍हणून पाहतो. हा सहयोग अत्‍यंत यशस्‍वी आहे आणि आम्‍ही आगामी वर्षांमध्‍ये लाभदायी सहयोगासाठी उत्‍सुक आहोत.”

 

सहयोगाची घोषणा करत कोका-कोला इंडिया फाऊंडेशनचे संचालक राजीव गुप्‍ता म्‍हणाले, “कोका-कोला इंडियामध्‍ये आमचा समुदायांना प्रेरित करण्‍यासोबत एकत्र आणण्‍यासाठी क्रीडाच्‍या परिवर्तनात्‍मक क्षमतेवर विश्‍वास आहे. हॉकी इंडियासोबतचा सहयोग क्रीडा व खेळाडूंच्या विकासासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करण्‍याच्‍या आमच्‍या संयुक्‍त दृष्टिकोनाला अधिक दृढ करतो. यासह आम्‍हाला क्रीडामध्‍ये महिलांना प्रायोजक करण्‍याचा आणि जागतिक स्‍तरावर त्‍यांच्‍या यशाप्रती योगदान देण्‍याचा अभिमान वा

टतो.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments