Sunday, October 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedछ्त्रपती संभाजी नगरमध्ये छ्त्रपती संभाजी किंग्स संघाचे सराव सामने रंगणार एमपीएलच्या...

छ्त्रपती संभाजी नगरमध्ये छ्त्रपती संभाजी किंग्स संघाचे सराव सामने रंगणार एमपीएलच्या तयारीसाठी सहभागी संघ मैत्रीपूर्ण लढती खेळणार

संभाजीनगर , 9 मे 2024: इंडियन प्रीमियर लीग संपत असताना महाराष्ट्र प्रीमियर लीगचे घुमारे घुमू लागले आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी फ्रँचायझी संघ आपापसात सराव सामने खेळणार आहेत. याचाच एक भाग म्हणून छ्त्रपती संभाजी किंग्स संघ आपल्या घरच्या मैदानावर छ्त्रपती संभाजी नगरमध्ये दोन सराव सामने खेळणार आहे.

 

छत्रपती संभाजी किंग्स संघ पहिला सराव सामना पुणेरी बाप्पा संघाशी 10 मे रोजी खेळणार असून दुसरा सराव सामना रत्नागिरी जेट्स संघाशी 11मे रोजी खेळणार आहे. हे दोन्ही सामने गरवारे मैदानावर होणार आहेत.

 

सीएसकेचा आयकॉन खेळाडू व भारताच्या 19 वर्षाखालील विश्वचषक संघातील खेळाडू राजवर्धन हंगरगेकर, मुर्तझा ट्रंकवाला, दिग्विजय पाटील, ओंकार खाटपे, अनुराग कवडे, सौरभ नवले, रामेश्वर दौंड हे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

 

एमपीएल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली असून याचीच पूर्वतयारीसाठी सराव सामने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेस 2 जूनपासून गहुंजे येथील एमसीएच्या स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.

 

गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाबरोबरच छत्रपती संभाजी किंग्स(सीएसके), कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, सोलापूर रॉयल्स हे संघ झुंजनार आ

हेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments