Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुवा संकल्पपत्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

युवा संकल्पपत्राचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

 

 

शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या माध्यमातून युवक कल्याणासाठी शहर भाजपच्या वतीने विकसित भारत आणि विकसित पुण्यासाठीचा युवा संकल्पपत्र आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

 

लोकसहभाग आणि संवाद हा भाजपचा पाया आहे. त्यातून युवक आणि प्रथम मतदारांशी संवाद साधण्याचा उपक्रम आकारला आला. आयडिया फॉर भारत-युवा मन की बात, भाजपचा जाहीरनामा याबाबत युवा मतदारांचा फीडबॅक घेण्यात आला. त्यात 70 हजार हून अधिक युवा मतदारांशी थेट संवाद साधला. त्यातून युवकांचे संकल्पपत्र आकाराला आले आहे. प्रतिसाद देणाऱ्यांमध्ये 45 टक्के महिलांशी संवाद साधण्यात आला. विकसित भारताच्या संकल्पात युवकांना भारतासाठी आणि पुण्यासाठी काय अपेक्षा आहेत हे समजून घेण्यात आले. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप यासह कल्याणकारी योजनांबद्दल युवा समाधानी आहेत. मोदीजींची मन की युवा मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.

 

शिक्षणातून समृद्धी, रोजगारक्षम कौशल्य विकास, राष्ट्रप्रेमी युवा व्यक्तिमत्त्वाचा विकास, सुशिक्षित युवतींच्या माध्यमातून देशाची प्रगती, सांस्कृतिक कार्यक्रमातून विकास, पायाभूत सुविधांवर सुंदर व गतिमान शहर, नवतंत्रज्ञानाची साथ, क्रीडा धोरण या विषयांच्या माध्यमातून युवकांचे कल्याण साधण्याच्या उद्देशाने या जाहीरनाम्याची निर्मिती केल्याची माहिती प्रदेश भाजपचे आणि संयोजक उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments