Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदानासाठी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी भर पगारी रजा*

मतदानासाठी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवार 13 मे रोजी भर पगारी रजा*

रायगड दि १० (जिमाका) :-33 मावळ लोकसभा मतदारसंघात क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी सोमवार 13 मे 2024 रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.

जिल्हातील 33 मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात सोमवार 13 मे रोजी मतदान होणार आहे . या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दिनांक 13 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती/अटीस अधिन राहून देय आहे. 1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. 2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही. 3) सदर आदेशाचे पालन न करणा-या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील. 4) सदरहू आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments