Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाविसा फाऊंडेशनतर्फे मतदान केलेल्या नागरिकांसाठी सवलत

भाविसा फाऊंडेशनतर्फे मतदान केलेल्या नागरिकांसाठी सवलत

पुणे – राष्ट्रहित सर्वतोपरी या न्यायाने कार्य करणाऱ्या भारतीय विचार साधना फाऊंडेशनच्या वतीने लोकशाही मधील आपला मोलाचा मतदान हक्क बजावणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी विशेष योजना राबविण्यात येत आहे.

देशहिताचे भान राखत लोकशाहीचे मूल्य म्हणजे मतदान. मतदानाचा हक्क बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते पार पाडून शंभर टक्के मतदान करण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

मतदान केलेल्या सर्व नागरिकांना भारतीय विचार साधनाद्वारे प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांवर २० टक्के थेट सवलत मिळणार आहे. ही योजना १३,१४ व १५ मे २०२४ पर्यंत आहे. सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय विचार साधना फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments