पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे राष्ट्रीय काँगेस पक्षाकडून उमेदवार आहेत. शिवसंग्राम प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेली २२/२३ वर्षे “मराठा” समाजासाठी काम करतो. मराठा समाजाची अपेक्षा मराठा आमदार अथवा खासदारांची संख्या वाढवणे ही नसून मराठा समाजाचे प्रश्न सोडवतील, त्यांच्या पाठीशी थांबतील असे लोकप्रतिनिधी संसदेत पाठवणे ही आहे.
आताही मराठा नेत्यांची, आमदार-खासदारांची संख्या कमी नाही. पण मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर उच्चस्तरीय चौकशी समिती (SIT) नेमण्याच्या ठरावाला विरोध विधिमंडळाच्या दोनही सभागृहात एकाही मराठा आमदाराने केला नाही. जरांगे यांच्या विरोधातील SIT ला विरोध केला तो रवींद्र धंगेकर या एकमेव आमदाराने !
आंतरवल सराटी येथे मराठा समाजाच्या अबाल-वृध्दांसह माता-भगिनींवर जो अमानुष लाठीहल्ला व गोळीबार झाला त्याचे आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा चेला आता “मराठा” उमेदवार म्हणून भाजपने दिला आहे. मराठ्यांना जातीने नव्हे तर नीतीने मराठा असलेला खासदार हवा आहे. मराठा आया-बहिणींची फुटलेली डोकी, सांडलेलं रक्त समाज कदापि विसरू शकत नाही.
या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसंग्राम फाउंडेशनच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार श्री.रवींद्र धंगेकर यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा देत आहोत असे शिवसंग्रामचे अध्यक्ष तुषार काकडे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.


